Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवासी तरुणीवरील अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी…

दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील महिलांना कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एका संशयित आरोपीचे रेखाचित्र ग्रामीण पोलिसांनी तयार केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 04, 2025 | 12:25 PM
प्रवासी तरुणीवरील अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी...

प्रवासी तरुणीवरील अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील महिलांना कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एका संशयित आरोपीचे रेखाचित्र ग्रामीण पोलिसांनी तयार केले आहे. त्यासंदंर्भाने कोणाला काही माहिती असल्यास त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड भागात सोमवारी पहाटे ही घटना घडली होती. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गेल्या आठवड्यात (दि. ३० जून) पुण्याहून देवदर्शनास कारने निघालेले कुटुंब पहाटे दौंड परिसरातील स्वामी चिंचोली येथे एका हॉटेलजवळ थांबले होते. कुटुंब चहा पिण्यासाठी थांबले असता दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेला कोयत्याचा धाक दाखविला. डोळ्यात मिरची पूड टाकून महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर महिलेबरोबर असलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून हॉटेलच्या मागील झाडीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर चोरटे पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबांनी दौंड पोलिसांकडे धाव घेतली होती.

पोलिसांकडून पथके तैनात

या घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा माग काढण्यासाठी पथके तयार केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, दौंड, तसेच भिगवण पोलीस ठाण्यातील दहा पथके चोरट्यांचा मागावर आहेत. तरुणी व इतरांनी पाहिल्यावरून पोलिसांनी रेखाचित्र तयार केले आहे. संशयिताची माहिती असल्यास त्वरीत उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (मोबाइल क्रमांक- ९०४९६६४६७३), सहायक निरीक्षक राहुल गावडे (मोबाइल क्रमांक -९८२३१६५०८०), सहायक निरीक्षक दत्ताजी मोहिते (मोबाइल क्रमांक- ८३०८८४४००४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : महिलेवर चाकूने वार करुन अत्याचार; न्यायालयाने नराधमाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Web Title: Police have formed teams to arrest the accused who molested the young woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला
1

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…
2

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड

शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
4

शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.