
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे: गुरुवारी १३ नोव्हेम्बर रोजी पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात एका कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये कारचालक असलेल्या ३० वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धनंजय कोळी यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी चिमुकल्या लेकराचं आगमन झालं होत. आता या तीन महिन्यांचा चिमुकल्याचा डोक्यावरून बापाचं छत्र कायमचं हरपलं आहे.
Kalyan Crime: शाळेतून घरी आली आणि…,14 वर्षीय मुलीने 19व्या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?
नेमकं काय घडलं?
अपघातावेळी धनंजय कोळी यांची कार दोन ट्रकच्या मधोमध अडकली आणि कारमधील पाच जणांना बाहेर पडता आला नाही. अचानक आग लागल्याने आगीत सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. यात धनंजय कोळी यांचा देखील समावेश होता. धनंजय कोळी यांना तीन महिन्यांचा मुलगा आहे. आता त्या बाळाच्या डोक्यावरून बापाचं छत्र कायमचं हरपलं आहे. अपघात झाला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा लातूर येथे होते, तर आई-वडील पुण्यात होते. धनंजय सहा महिन्यांपासून वाहतुकीचा व्यवसाय करत होता. त्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत काम करत होता. धनंजय मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा आहे.
नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या
धनंजय गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे राहत होता. त्याने काही नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत. इन्स्टाग्राम प्रोफाईलवरती त्याने स्वतःचा अभिनेता असा उल्लेख केला आहे. नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात तीन महिन्यांच्या मुलाने पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धनंजय कोळी पुण्यात राहून आपली नाटकांची आवडही जोपासत होता. अवघ्या काही दिवसांपूर्वीच धनंजयच्या पत्नीने त्याच्यासह शेअर केलेली डोहाळ जेवणाची पोस्ट या हसऱ्या कुटुंबाची शेवटची ठरली.
नातेवाईकांनी व्यक्त केली भावना
‘या अपघातात धनंजयचा हकनाक बळी गेला. आणि त्यांच्या तीन महिन्यांचा मुलावरचं वडिलांचं छत्र हरपलं, तो वडिलांच्या प्रेमाला पारखा झाला,’ अशी भावना त्यांचे नातेवाइक व्यक्त करत आहेत.
Ans: चिखली
Ans: नवले-पुल
Ans: तीन