crime (फोटो सौजन्य: social media )
पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका मार्गावर ते ही एकाच ठिकाणी गेल्या तीन तासात तब्बल दहा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. पण या अपघाताला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नारिकांनी विचारला आहे.
Parbhani Crime : उर्वरित फिससाठी संस्थाचकांकडून मारहाण; मारहाणीत पालकाचा मृत्यू, आरोपी अद्याप फरार
काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहू ते येलवाडी मार्गावर हे दहा अपघात एकाच ठिकाणी झाले आहेत. या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे
अपघात घडू शकतो आणि एखाद्याचा त्यात नाहक बळी जाऊ शकतो म्हणून स्थानिकांनी खड्डे बुजवण्याची विनंती केली. तर प्रशासनाने मलमपट्टी म्हणून या खड्ड्यात मुरूम आणून भरला. मात्र पावसामुळे त्या मुरमाचा चिखल झाला आणि तो रस्त्यावर पसरला. या चिखलामुळे दुचाकीस्वार एकामागोमाग एक घसरून जखमी होत आहेत. एखादाच्या जीव जाण्याआधी प्रशासन यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आता हे पाहणं महत्वाचं ठरतेय की प्रशासन यावर काय तोडगा काढते.
दारू पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाला सख्ख्या मोठ्या भावाने संपवलं
दरम्यान पुण्यातून एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. सख्ख्या भावाने आपल्याच लहान भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. दारूसाठी कुटुंबियांना त्रास देत असल्याने ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (24) असे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव अनिकेत दत्तात्रय नवले (26 ) असे आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
प्रवीण आणि अनिकेत हे दोघे बिबवेवाडी भागात राहतात. प्रवीण कामधंदा करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूसाठी पैसे मागून तो कुटुंबियांना त्रास द्यायचा. सोमवारी (14जुलै) सकाळी अनिकेत प्रवीणला समजावून सांगण्यासाठी गेला होता. दारू पियुन आम्हाला त्रास देऊ नको. असे त्याने प्रवीणला सांगितले. त्यावर प्रवीणने अनिकेट्सही वाद घातला. वादातून अनिकेतने प्रवीणवर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रहिवाशांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान प्रवीणचा मृत्यू झाला आहे. आरोपी अनिकेतला पोलिसांनी अटक केली असून पुढील करावी करण्यात येत आहे.
माजी नगरसेवकाच्या मुलाला अमली पदार्थासह अटक; कारसह 18.17 लाख रुपयांचा माल जप्त