Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Drugs Arrest News: बँकॉक ते पुणे… तस्करीची अशी पद्धत की अधिकारीही चक्रावले! शूजच्या सोलमधून हशिशची धक्कादायक तस्करी

Pune Drugs Arrest News: णे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाने तस्करीचा अजब प्रकार केला. सामानात काहीच न मिळाल्याने सोडले जाणार इतक्यात कस्टम अधिकाऱ्यांची नजर प्रवाशाच्या स्पोर्ट्स शूजवर गेली. शूजचे सोल कापताच तब्बल १३.५ लाख रुपयांचे हशिश आढळले. तस्करीची ही पद्धत पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 29, 2026 | 10:58 AM
Pune Drugs Arrest News: बँकॉक ते पुणे... तस्करीची अशी पद्धत की अधिकारीही चक्रावले! शूजच्या सोलमधून हशिशची धक्कादायक तस्करी

Pune Drugs Arrest News: बँकॉक ते पुणे... तस्करीची अशी पद्धत की अधिकारीही चक्रावले! शूजच्या सोलमधून हशिशची धक्कादायक तस्करी

Follow Us
Follow Us:
  • विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या शूजमधून १३.५ लाखांचे हशिश जप्त
  • सामानात काही न मिळाल्याने शूजचे सोल कापताच तस्कराचा कट उघड झाला
  • ३८९ ग्रॅम हशिशसह तस्कराला अटक करून ७ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली
Pune Drugs Arrest News: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचा एक अत्यंत विचित्र आणि हायटेक प्रकार सीमाशुल्क (Customs) अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. बँकॉकहून पुण्यात उतरलेल्या एका भारतीय प्रवाशाने आपल्या स्पोर्ट्स शूजच्या सोलमधील खास कप्प्यांमध्ये लपवून आणलेले लाखो रुपयांचे हशिश ड्रग्ज अधिकाऱ्यांनी कारवाई करत जप्त केले. प्रवाशाची ही अनोखी आणि चलाख पद्धत पाहून खुद्द कस्टम अधिकारीही अवाक झाले आहेत.

नेमकी कशी झाली कारवाई?

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेसच्या (IX-291) विमानाने आलेल्या एका प्रवाशावर नजर ठेवली होती. विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे अधिकाऱ्यांनी त्याला रोखून त्याच्या सामानाची कसून तपासणी केली. मात्र, सुरुवातीला त्याच्या सामानात काहीही संशयास्पद आढळले नाही.

हेही वाचा: Tiger Shroff Firing Case Update: सुरक्षा रक्षकांशिवाय फुटबॉल खेळत होता टायगर! शूटर अगदी जवळ, तरीही का नाही झाला हल्ला?

काळ्या स्पोर्ट्स शूजचे सोल कापताच गूढ उकलले!

सामानात काहीही न मिळाल्याने प्रवाशाला सोडण्यात येणार इतक्यात अधिकाऱ्यांचे लक्ष त्याने घातलेल्या काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स शूजकडे गेले. या शूजची जाडी आणि अवाजवी वजन पाहून अधिकाऱ्यांना तीव्र संशय आला. अधिकाऱ्यांनी बुटांची बारकाईने पाहणी करत थेट शूजचे सोल कापले. सोल कापताच आतमध्ये अंमली पदार्थ लपवण्यासाठी अत्यंत चाणाक्षपणे तयार केलेले खास कप्पे आढळले, ज्यात हशिशचे पॅकेट्स दडवण्यात आले होते.

हेही वाचा: Jalgaon Accident News: संसाराची सुरुवात होण्यापूर्वीच नियतीने साधला घाला; पाळधी-तरसोद बायपासवर तरुणाचा करुणास्पद अंत

१३.५ लाखांचे हशिश जप्त; ७ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

या धडक कारवाईत सीमाशुल्क विभागाने तब्बल ३८९.२७ ग्रॅम हशिश (Hashish) जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत सुमारे १३ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. सीमाशुल्क विभागाने तात्काळ या प्रवाशाला अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS Act) अटक केली. न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीत आणखी कोणाचा हात आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे विमानतळावर हशिशची तस्करी कशी उघडकीस आली?

    Ans: बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या काळ्या स्पोर्ट्स शूजचे वजन आणि जाडी संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी शूजचे सोल कापून त्यातील हशिश जप्त केले.

  • Que: जप्त करण्यात आलेल्या हशिशचे वजन आणि किंमत किती आहे?

    Ans: कारवाईत ३८९.२७ ग्रॅम हशिश जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे १३ लाख ५० हजार रुपये आहे.

  • Que: आरोपी प्रवाशाला कोणती शिक्षा किंवा कोठडी सुनावण्यात आली आहे?

    Ans: सीमाशुल्क विभागाने आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Pune airport hashish hidden in sports shoes sole from bangkok passenger sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Drug Case
  • flight
  • pune crime case

संबंधित बातम्या

Pune High Profile Case: पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा! छापा टाकताच अधिकारीही चक्रावले
1

Pune High Profile Case: पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा! छापा टाकताच अधिकारीही चक्रावले

ATM Theft Attempt: मध्यरात्री संधी साधून एटीएममध्ये शिरले चोरटे; पुण्यात पैशांसाठी मशीनचीच केली प्रचंड नासधूस
2

ATM Theft Attempt: मध्यरात्री संधी साधून एटीएममध्ये शिरले चोरटे; पुण्यात पैशांसाठी मशीनचीच केली प्रचंड नासधूस

Pune Crime: मैत्रीण धावली म्हणून वाचला जीव! पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न…
3

Pune Crime: मैत्रीण धावली म्हणून वाचला जीव! पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.