Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

पुण्यासह राज्यभर खळबळ उडवून दिलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेचा दुसरा जामीन अर्जही पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2025 | 12:04 PM
स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यासह राज्यभर खळबळ उडवून दिलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेचा दुसरा जामीन अर्जही पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्याने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असून, या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे निरीक्षण नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी गाडेला जामीन देण्यास नकार दिला तसेच त्याच्याविरोधात आरोप निश्चिती करण्यासाठी पुढील सुनावणीला न्यायालयात हजर करण्याचे आदेशही पुणे पोलिसांना दिले.

स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये दत्तात्रेय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केला होता. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी गाडेविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधात ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गाडेने अॅड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी केलेला पहिला अर्ज सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फेटाळला. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत गाडेने पुन्हा आपल्या वकिलांमार्फत दुसरा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला.

हा बलात्कार नसून, परस्पर सहमतीने संबंध आहेत. आरोपीची पत्नी व दोन मुले त्याच्यावर अवलंबून आहेत. या प्रकरणी तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र दाखल झाले असल्याने परिस्थितीत बदल झाला आहे. या आधारावर आरोपीला जामीन द्यावा, असा बचाव वाजेद खान बिडकर यांनी केला. त्याला विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि पीडितेच्या वकील श्रीया आवले यांनी विरोध दर्शविला. आरोपीचा पहिला जामीन अर्ज आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीच फेटाळण्यात आला असल्याने परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याने महिलेवर लैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा केला असून, त्याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू शकतो, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला.

Web Title: Pune court rejects accused datta gades bail application for the second time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • crime news
  • Datta Gade Arrested
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.