Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेहुण्यानेच जावयाचा काढला काटा, भर चौकात रक्तरंजित थरार; नागपुरातील घटनेनं खळबळ

मेडिकल चौकासारख्या गजबजलेल्या परिसरात गुरुवारी रात्री जुन्या वादातून रक्तरंजित थरार घडला. सख्ख्या मेहुण्याने तीन साथीदारांच्या मदतीने जावयावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करून त्याची हत्या केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 14, 2026 | 03:12 PM
मेहुण्यानेच जावयाचा काढला काटा, भर चौकात रक्तरंजित थरार; नागपुरातील घटनेनं खळबळ

मेहुण्यानेच जावयाचा काढला काटा, भर चौकात रक्तरंजित थरार; नागपुरातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वादातून जावयाची हत्या
  • मेहुण्यासह तीन साथीदारांकडून हल्ला
  • धारदार शस्त्रांनी वार; चौघेही पसार
नागपूर : मेडिकल चौकासारख्या गजबजलेल्या परिसरात गुरुवारी रात्री जुन्या वादातून रक्तरंजित थरार घडला. सख्ख्या मेहुण्याने तीन साथीदारांच्या मदतीने जावयावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करून त्याची हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येनंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, अजनी पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

 

पलाश ऊर्फ गन्नी प्रकाश वासनिक (वय ३१, रा. रामबाग) असे मृताचे नाव आहे. आयुष धुपे हा मुख्य आरोपी असून तो पलाशचा सख्खा मेहुणा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यासोबत आणखी तीन जण या हत्येत सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मेडिकल चौकातून जात होता. त्यावेळी आयुष धुपे हा तीन साथीदारांसह तेथे आला. आरोपींनी पलाशला अडविले. त्यानंतर त्यांच्यात जुन्या वादातून बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपींनी पलाशवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने पलाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. डीसीपी दीपक अग्रवाल, डीसीपी रश्मिता राव, एसीपी नरेंद्र हिवरे यांच्यासह अजनी आणि हुडकेश्वर पोलिसांची पथके दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील गर्दीवर नियंत्रण मिळवत घटनास्थळाची पाहणी केली. तसेच पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले.

हे सुद्धा वाचा :  ३५व्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाबळेश्वरमध्ये बालचमूंच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. अजनी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या चारही आरोपींचा शोध सुरू आहे. हत्या नेमक्या कोणत्या जुन्या वादातून झाली, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! 

दिवाळीच्या उत्सवात शहरात सर्वत्र आनंद आणि रोषणाईचे वातावरण असताना दुसरीकडे किरकोळ वादातून चाकू, कोयते आणि लोखंडी शस्त्रांनी हल्ले करण्याच्या आठ घटनांनी छत्रपती संभाजीनगर शहर हादरले आहे. या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: An incident has occurred in nagpur where four people murdered a young man nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण
1

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण

घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या
3

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या

सातबारा आणि फेरफार नोंदीसाठी लाचेची मागणी; महिला मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
4

सातबारा आणि फेरफार नोंदीसाठी लाचेची मागणी; महिला मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.