Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण

एकतर्फी प्रेमातून मित्राकडूनच तरूणीचा ऑनलाईन पाठलाग केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाची मागणी घालत बदनामी करण्याची धमकी दिल्याने पिडीतेने पोलीसात धाव घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 14, 2026 | 01:44 PM
‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर...’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर...’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण

Follow Us
Follow Us:
  • लग्नास नकार दिल्याने तरुणीला धमकी
  • शिवीगाळ करून मारहाण
  • बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवरून ऑनलाइन छळ
नाशिक : एकतर्फी प्रेमातून मित्राकडूनच तरूणीचा ऑनलाईन पाठलाग केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाची मागणी घालत बदनामी करण्याची धमकी दिल्याने पिडीतेने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटीॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

 

अभिषेक पांडूरंग डहाळे (वय २३ रा. जे.के. टायर्स जवळ, दसक जेलरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार सन. २०२५ मध्ये दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्याने संशयिताने लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने त्याला नकार देत आपण फक्त मित्र व मैत्रीण असल्याचे बजावले होते. या घटनेस काही दिवस उलटत नाही तोच संशयिताने गेल्या शुक्रवारी (दि.९) रात्री पिडीतेस नारायण बापू चौकात बोलावले.

पिडीता या ठिकाणी गेली असता संशयिताने पुन्हा लग्नाचा आग्रह धरला. तरूणीने त्यला स्पष्टपणे नकार दिला असता त्याने शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच तरूणीच्या हातातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली. माझ्याशी लग्न केले नाही तर तुझेही लग्न होवू देणार नाही, कुटूंबियांची बदनामी करेन आणि तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकीही दिली होती. यानंतर मात्र संशयिताने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून व व्हॉटसअपवर मॅसेज करून पाठलाग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निरीक्षक बडे या गुह्याचा तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

१५ वर्षीय प्रेयसीच्या घरदारावर प्रियकराचा रक्तरंजित हल्ला

आरोपी ज्ञानप्रकाश याचे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मुलगी अल्पवयीन असल्याने आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून तिच्या पालकांनी या नात्याला कडाडून विरोध केला होता. घरच्यांच्या समजावणीनंतर मुलीने आरोपी ज्ञानप्रकाशसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते. आपली प्रेयसी दुरावल्याने आणि तिच्या घरच्यांकडून होत असलेल्या विरोधामुळे ज्ञानप्रकाश प्रचंड संतापला होता. याच रागातून त्याने अत्यंत क्रूर पाऊल उचलले. हातात धारदार शस्त्र घेऊन तो थेट मुलीच्या घरात घुसला. घरात शिरताच त्याने काहीही विचार न करता थेट मुलीच्या पालकांवर हल्ला चढवला. आरोपीने केलेल्या या अचानक आणि भीषण हल्ल्यात मुलीची आई, मेरी रेगिला, यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून घरात एकच खळबळ उडाली. आरोपीने मुलीचे वडील, मुथुकृष्णन, यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणीचा ऑनलाइन पाठलाग केल्याचा आरोप कोणावर आहे?

    Ans: अभिषेक पांडूरंग डहाळे (वय २३, रा. दसक, जेलरोड) याच्यावर तरुणीचा ऑनलाइन पाठलाग केल्याचा आरोप आहे.

  • Que: तरुणीने पोलिसांत तक्रार का दाखल केली?

    Ans: लग्नास नकार दिल्यानंतर संशयिताने शिवीगाळ व मारहाण केली. तसेच बदनामी करण्याची आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

  • Que: संशयिताविरुद्ध कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार (आयटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक बडे करीत आहेत.

Web Title: An incident has occurred in which a young man threatened a young woman nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
1

घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या
2

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या

सातबारा आणि फेरफार नोंदीसाठी लाचेची मागणी; महिला मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
3

सातबारा आणि फेरफार नोंदीसाठी लाचेची मागणी; महिला मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Farmers Protest: ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!
4

Farmers Protest: ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.