Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: धक्कादायक!अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाची सुपारी देऊन हत्या; पुण्यातील प्रकरण

पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून चुलत भावाचा निर्घृण खून. आरोपी अशोक पंडितने तीन साथीदारांना चार लाखांची सुपारी दिली. पोलिसांनी चार जणांना झारखंडला पळण्यापूर्वीच अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 02, 2025 | 09:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • चुलत भावाची हत्या करण्यासाठी चार लाखांची दिली सुपारी
  • 22 वर्षीय अजयकुमार पंडितचा खून
  • आरोपी झारखंडला पळून जाण्याचा प्रयत्न करताना अटक
पुणे: पुणे शहरात पुन्हा एकदा नातेसंबंधातून उद्भवलेली गंभीर गुन्हेगारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाचा खून करण्यासाठी सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव अजयकुमार गणेश पंडित (वय 22, साईनगर, खोपडेनगर, कात्रज; मूळ रा. हजारीबाग, झारखंड) असे आहे.

धक्कदायक ! व्यापाऱ्याला 2.8 कोटींचा गंडा; लाल दिव्याच्या गाडीने पोहोचला घरी अन्…

घटना कशी घडली?

17 नोव्हेंबर रोजी कात्रजमधील गुजरवाडी परिसरात अजयकुमारचा तीक्ष्ण शस्त्राने खून करण्यात आला होता. या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान अनेक धागेदोरे मिळत गेले आणि अखेर या हत्या प्रकरणामागील कुटुंबातीलच एक संशयित असल्याचे निष्पन्न झाले.

अजयच्या चुलत भावाला, अशोक कैलास पंडित (वय 35, रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याला संशय होता की अजयकुमारचे त्यांच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. या रागातून आणि सूडाच्या भावनेतून अशोकने अजयकुमारची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने बाहेरगावी असलेल्या गुंडांना सुपारी देण्याचा कट रचला.

चार लाखांची सुपारी

अशोक पंडितने हत्या करण्यासाठी चार लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आणि या कामासाठी तीन साथीदारांची निवड केली—

  • कृष्णकुमार विजयमहतो वर्मा (21)
  • सचिनकुमार शंकर पासवान (26)
  • रणजितकुमार धनुखी यादव (30) —जो या प्रकरणातील पहिला साक्षीदार ठरला.
तिघांनी मिळून अजयची हालचाल टिपली आणि योग्य संधी साधून त्याची निर्घृणपणे हत्या केली. आरोपींनी गुन्ह्यानंतर पुण्यातून पलायन करण्याचा प्लॅन आखला होता.

पोलिसांची वेगवान कारवाई

पुणे पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी रेल्वेने झारखंडला पळून जाण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनी वेळीच सापळा रचून चौघांनाही अटक केली. सध्या सर्व आरोपींची चौकशी सुरू असून आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे नातेसंबंधातील अविश्वास आणि सूड कसा विकृत स्वरूप धारण करू शकतो याचे हे आणखी एक उदाहरण ठरले आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! साडेतीन वर्षे छळ, पतीने ‘तिहेरी तलाक’चा मजकूर कुरिअरने पाठवला

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: कात्रजमधील गुजरवाडी परिसरात ही हत्या करण्यात आली.

  • Que: हत्या का केली गेली?

    Ans: अजयकुमारचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशयामुळे.

  • Que: सुपारी किती रकमेची होती?

    Ans: चार लाख रुपये.

Web Title: Pune crime cousin killed by betel nut on suspicion of having an immoral relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! साडेतीन वर्षे छळ, पतीने ‘तिहेरी तलाक’चा मजकूर कुरिअरने पाठवला
1

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! साडेतीन वर्षे छळ, पतीने ‘तिहेरी तलाक’चा मजकूर कुरिअरने पाठवला

Lawrence Bishnoi : एकमेकांचे पक्के दोस्त, पण आता कट्टर दुश्मन, अनमोलला धमकी देणारा शहजाद भट्टी कसा बनला लॉरेन्स बिश्नोईचा शत्रू?
2

Lawrence Bishnoi : एकमेकांचे पक्के दोस्त, पण आता कट्टर दुश्मन, अनमोलला धमकी देणारा शहजाद भट्टी कसा बनला लॉरेन्स बिश्नोईचा शत्रू?

Pune News: खेड, जुन्नर झाल आता बिबट्या पुण्यातही! बावधनमध्ये आढळला बिबट्या
3

Pune News: खेड, जुन्नर झाल आता बिबट्या पुण्यातही! बावधनमध्ये आढळला बिबट्या

क्षुल्लक कारण! दोन कामगारांमध्ये झालेल्या वादात एक ठार,वाळूज औद्योगिक वसाहतीमधील घटना
4

क्षुल्लक कारण! दोन कामगारांमध्ये झालेल्या वादात एक ठार,वाळूज औद्योगिक वसाहतीमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.