फिर्यादीत काय?
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२२ मध्ये निकाहनानंतर सुरुवातीला संसार सुरळीत होता. नंतर तिच्या कडून व्यवसायासाठी पैश्यांची मागणी करण्यात आली,परंतु ही मागणी पूर्ण न केल्याने पतीसह सासू-सासऱ्यांनी पीडितेस मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. एवढेच नाही तर विवाहितेची आठ तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने ताब्यात घेतले गेले. यावरच छळ थांबला नाही तर तिच्या पतीने हस्ताक्षरासह लिहिलेली एक पत्रिका पाठवली. ज्यात तिहेरी तलाक लिहून एक मुजकूर लिहून पाठवले.
पत्रात नेमकं काय ?
“मैं अपने पूरे होशो हवास के साथ तहरीब लिख रहा हूँ कि मैं तुम्हे हस्न (सुन्नत) तरीके पर तलाक देता हूँ। लिहाजा मेरी ये तहरीब पहुंचने के बाद जब तुम हैज से पाक हो तो तुम्हें तलाक, फिर जब हैज मे पाक हो तो तलाक, फिर जब पाक हो तो तलाक. मैने जबान से भी तलाक दिया है। और लिखीत भी दे रहा हूँ, ताकी सनद रहे,” असे पात्रात लिहले आहे.
गुन्हा दाखल
पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीच्या आधारावर मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा, 2019 तसेच संबंधित कलमान्वये पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
तिहेरी तलाक बेकायदेशीर
तिहेरी तलाक ही प्रथा कायद्याने बेकायदेशीर आहे. तरीही अनेक मुस्लिम महिलांना या प्रथेचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘ट्रिपल तलाक’ असंवैधानिक घोषित केला आणि त्यानंतर मुस्लीम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) कायदा 2019 लागू करण्यात आला. या कायद्यानुसार तिहेरी तलाक देणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाते.कायद्याची अंमलबजावणी कठोर असूनही, अनेक ठिकाणी अशी प्रकरणे समोर येत आहेत.
या कायद्यात
Ans: पतीने हस्ताक्षरातील नोट कुरिअरद्वारे पाठवली आणि त्यात तीन वेळा तलाक दिल्याचे लिहिले.
Ans: पैशांसाठी छळ, मारहाण, मानसिक त्रास आणि सोन्याचे दागिने बळजबरीने घेण्याचा आरोप केला.
Ans: मुस्लीम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा 2019, ज्यात ट्रिपल तलाक गुन्हा समजला जातो.






