crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुणे: पुण्यातील कोंढव्यात मीरा भाईंदर मधील गांजा तस्करीतील आरोपीला पकडण्यासाठी एक टीम पुण्यात आली होती. सकाळी ताब्यात घेत असताना झटपट झाली आणि त्यात या आरोपीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्याच कारण अजून कळू शकल नाही. मात्र सकाळी त्याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आल होत.
या झटापटीत मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव अजीम अबू सालेम हे असे आहे. त्याच्यावर गांजा तस्करीतील अनेक गुन्हे दाखल केले आहे. मीरा भाईंदर मधील हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. त्याच्या शोधात टीम पुण्यात पोहोचली आणि कोंढव्यात त्याच लोकेशन पोलिसांत स्ट्रेस झाला. सकाळी त्याला ताब्यात घेण्यासाठी टीम आली आणि त्यात झटपट झाली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
नक्की मृत्यू कशामुळे ?
अजीम अबू सालेम हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. त्याने काल ड्रग्सच सेवन केल होत अशी माहिती मिळत आहे. त्याला ताब्यात घेत असताना झटापट झाली. मात्र त्याच्या मृत्यूच कारण हे अजून पर्यंत कळू शकलेल नाही आहे. ससून रुग्णालयाचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूच कारण कळू शकेल. मात्र याचा शोध हा मीरा भाईंदर पोलिसांकडून घेतला जात होता. मीरा भाईंदर पोलिस ड्रग्स रैकेटचा छडा लावण्यासाठी त्याचा शोध घेत होते. मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
पुणे ड्रग्सचा अड्डा बनला आहे का ?
पुण्यातील ललित पाटील ड्रग्स प्रकरण चर्चेत होत. जवळपास हजार कोटींचे ड्रग्स त्याच्याकडून जप्त केल होत. पुण्यातील बार, पब मध्ये सर्रास ड्रग्स विक्री होत असल्याचं पाहायला मिळाल. आता पुणे शहरात ड्रग्सला विळखा घालण्यासाठी पुणे पोलीस वेगवेगळी मोहीम हाती घेत आहेत.
महिलांना धमकी देत अश्लील वर्तन करणं तरुणाला भोवलं; पोलिसांत गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात उपसरपंचाकडून महिलेला मारहाण; कारण काय तर…
शिरुर तालुक्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने गावातील एका महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा प्रदीप रणदिवे (वय ६०, रा. बिबे गावठाण, वढू बुद्रुक, ता. शिरुर, जि. पुणे) या आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर दुचाकी नेण्यासाठी डबर टाकून उंचवटा तयार करत होत्या. त्याचवेळी उपसरपंच संगीता शांताराम सावंत (रा. बिबे गावठाण, वढू बुद्रुक) या तेथे आल्या आणि त्यांनी प्रज्ञा रणदिवे यांना “येथे डबर टाकू नका” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.