पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला आहे. घायवळ गँगच्या गुन्हेगारांनी कोथरूड परिसरात गोळीबार केला होता. तेव्हा पासून निलेश घायवळ वर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो परदेशात पळून गेल्याचं समोर आल आहे. मात्र या आधीच्या गुन्ह्यात जामीन देताना कोर्टाने काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. या जर अटी आणि नियमांच उल्लंघन झालं तर कारवाई होईल अस स्पष्ट आदेश दिले होते. मात्र या निलेश घायवळ याला पासपोर्ट जमा करायला सांगितला होता. मात्र त्याने तो जमा केला नाही. आता पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पुणे पोलिसांनी काय म्हटल आहे ते वाचा.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याची पोलिसाला मारहाण; खोलीत जाण्याच्या सूचना देताच…
याचिकेत पुणे पोलीस काय म्हणाले ?
निलेश गायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती.
गायवळ याने जामिनात असलेल्या अटी शर्तीचे पालन न केल्यामुळे जामीन रद्द करावा अशी पोलिसांची मागणी.
गायवळ याने पोलिस ठाण्यात हजेरी चुकवली आहे.
तसेच पासपोर्ट जमा न केल्यामुळे त्याचा जामीन रद्द करावा असे पोलिसांनी याचिकेत म्हटलं आहे.
निलेश घायवळ याने जिल्हा सत्र न्यायालयात न जाता थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात आमचा संबंध नाही. मीडिया ट्रायल चालवून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ज्यांनी गोळीबार केला आहे त्यांना मी ओळखत नाही अस निलेश घायवळ याने याचिकेत म्हटला आहे. मात्र आता पुणे पोलिसांनी थेट जामीन रद्द करावा ही मागणी केल्याने निलेश घायवळ याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पासपोर्ट बनवत असताना त्याने पासपोर्ट कार्यालयाची फसवणूक केली आहे. त्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जवळपास ९ गुन्हे आता पर्यंत पुणे पोलिसांनी दाखल केले आहेत.
घायवळ भावांच्या पुणे पोलीस मुसक्या आवळणार ?
पुणे पोलिसांनी निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याच्यावर पण गुन्हा दाखल केला आहे. मकोका अंतर्गत कारवाई केल्याने त्यांची आता अडचण झाली आहे. निलेश घायवळ याच्या पश्चात सचिन घायवळ हा टोळी चालवत होता. आता दोन्ही भावांवर गुन्हा दाखल आहे. सचिन घायवळचा शोध हा पुणे क्राइम ब्रांच घेत आहेत तर निलेश घायवळ याला परदेशातून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.