महिलांना धमकी, अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा (संग्रहित फोटो)
पाटण : बदनामी करत असल्याबाबत विचारणा केली म्हणून महिलांशी उद्धटपणे बोलून अरेरावीची भाषा वापरली. तसेच महिलांना अश्लील व गलीच्छ भाषेत शिवीगाळ करत बेशिस्त वर्तन करून छेडछाड करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच महिलांना बघून घेतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी येथील विकास हादवे याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलांनी पाटण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, बुधवारी (दि.१५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाटण पंचायत समिती आवारात बचत गटातील महिलांनी विकास हादवे याला ‘तू आमची बदनामी का करतोस?’ असा जाब विचारत विचारणा केली. यावर विकास हादवे याने महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच उद्धटपणे बोलून अरेरावीची भाषा वापरली. शिवीगाळ का करतोस? असे विचारले असता सदर व्यक्तीने महिलांशी अश्लील वर्तन करून छेडछाड केली.
हेदेखील वाचा : पुण्यातील कुख्यात निलेश घायवळ परदेशात फरार; पासपोर्ट न जमा केल्याने पुणे पोलिसांची जामीन रद्द करण्याची उच्च न्यायालयात याचिका
मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तुम्हाला बघून घेतो. तुमची वाट लावतो, अशी धमकी दिली. महिलांच्या अंगावर धावून येत धक्काबुक्कीही केली, असे बचत गटातील महिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीवरून सदर संशयित व्यक्तीवर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अद्यापही अटक करण्यात आली नाही. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून केला जात आहे.