
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय प्रकरण?
राणी गायकवाड आणि अनिकेत कांबळे या दोघांचे प्रेमसंबंध काही महिन्यांपासून सुरु होते. हे दोघेही विवाहित असून त्यांना मुले आहेत. राणी हिच्या घरी या नात्याची कुणकुण लागली. तिच्या घरच्यांनी दबाव आणायला सुरुवात केली. त्यामुळे राणी सतत अनिकेतला लग्नासाठी आग्रह करत होती. या दबावामुळेच अनिकेतने तिची हत्या करण्याचा कट रचला.
काय घडलं नेमकं?
अनिकेतने २७ नोव्हेंबरला राणीला फोन करून फिरायला जाऊ असे सांगितले. अनिकेत राणी भेटले. राणी कार मध्ये बसली. अनिकेतने कार धाराशिव जिल्ह्याकडे वळवली. राणी आणि त्याचा कारमध्ये पुन्हा लग्न आणि सोबत राहण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. कार ढोकी गावाजवळ पोहोचल्यावर राणी झोपलेली असताना अनिकेतने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर वार करीत मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने त्या मृतदेहावर पेट्रोल ओतून आग लावली.
राणी घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी वाकड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. राणीचा मोबाईल नंबर तपासला तेव्हा तिची शेवटचे लोकेशन आणि वारंवार झालेल्या कॉलची माहिती अनिकेतपर्यंत पोहोचली. यानंतर पोलिसांनी अनिकेतला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा अनिकेतने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक पुरावे दाखवताच अनिकेतने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ खळबळ उडाली असून वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.
Ans: राणी लग्न आणि सोबत राहण्याचा दबाव टाकत असल्याने अनिकेतने हत्या करण्याचा कट रचला.
Ans: कारमध्ये राणी झोपलेली असताना अनिकेतने गळा दाबून खून केला, रॉडने वार केले आणि मृतदेह पेटवून दिला.
Ans: राणीच्या मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक पुरावे तपासून पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेतले आणि चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली