crime (फोटो सौजन्य: social media)
पुण्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलीस शिपायांवर चार जणांच्या टोळीने अचानक हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडल्याचे समोर आली आहे. ही घटना चर्च चौक खडकी येथे ३१ जुलैच्या रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण भीतीचा वातावरण निर्माण झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार जणांना खडकी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे हे दोघे मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. पेट्रोलिंग दरम्यान, एका वाहनचालकाने अतिशय वेगात व वेडीवाकडी गाडी चालवत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला थांबवून विचारणा केली. मात्र, या क्षुल्लक कारणावरून वाहनात असलेल्या चार जणांनी संतप्त होऊन पोलिसांवर अचानक हल्ला चढवला.
आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले व बेदम मारहाण केली. घटनेनंतर जखमी पोलिसांनी तातडीने खडकी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गोपाल देवसिंग कोतवाल यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. आता करण्यात आलेल्या आरोपींचे नाव जुनेद इक्बाल शेख (वय 27), नफीज नौशाद शेख (वय 25), युनूस युसुफ शेख (वय 25), आरिफ अक्रम शेख (वय 25) अशी नावे आहे. फक्त वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या हेतूने पोलिसांनी केलेल्या साध्या सूचनेवरून हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. आरोपींच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आरोपींवर सरकारी कर्मचारी असलेल्या व्यक्तींवर ड्युटीदरम्यान हल्ला केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन फ्लॅट फोडून 5 लाखांचा ऐवज लांबविला
दरम्यान, पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, लॉ कॉलेज रस्त्यावरील एका ज्येष्ठाचा फ्लॅट फोडून पावणे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. त्यासोबतच विश्रांतवाडीत देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी २८ हजारांचा ऐवज चोरला आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील फ्लॅटमध्ये चोरी झाल्याप्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठाने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. ही घरफोडीची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार; अनेक गुन्हे दाखल होताच अखेर पोलिसांनी…