Crime news live updates
Crime news live updates : किरकोळ कारणावरून महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही घटना पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्तीत घडली आहे. या हाणामारीत एक महिला आणि दोन पुरूष असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
06 Mar 2025 12:49 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३६ वर्षीय महिलेने शारीरसुखाची मागणीला नकार दिल्यामुळे १९ वर्षीय तरुणीने तिच् अंगावरती कटरने वार केले. त्यामुळे तिला तब्बल २८० टाके घालावे लागले. सव्वादोन फुटांचा एक वार तर मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहे. ही पीडिता मृत्यूपेक्षाही भयानक वेदना सहन करत आहे. या महिलेवर एक खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. अभिषेक तात्याराव नवपुते असे या आरोपीचे नाव आहे.या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलेच नाही अशा आविर्भावात नराधम आरोपी फिरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
06 Mar 2025 11:49 AM (IST)
स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीचा मोबाईल अद्याप मिळालेला नाही. मोबाईलबाबत विचारल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे नराधम दत्तात्रय गाडेच्या मोबाईल शोध घेण्यासाठी पोलीस पुन्हा शेतात जाणार आहेत. तो लपलेल्या प्रत्येक ठिकाणी पोलीस मोबाईलचा शोध घेतील. मोबाइलमध्ये आणखी काही महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात, अशी खात्री पोलिसांना आहे. त्यामुळे मोबाईलचा शोध घेणे महत्वाचे आहे.
06 Mar 2025 11:41 AM (IST)
विधानपरिषदेत अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून एकच गदारोळ उडाला. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अबू आझमी यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना तुरुंगात का टाकण्यात आले नाही असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलं. यावेळी उत्तर देताना, अबू आझमी यांना 100 टक्के तुरुंगात टाकले जाईल. अबू आझमी असो वा दुसरे कोणीही असो. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही. आवश्यकता असल्यास आम्ही वरच्या कोर्टात दाद मागू असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.