Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस

PMPML Atharva Sudame : पुण्यातील रिलस्टार अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बसमध्ये परवानगीशिवाय रिल शुट केल्याप्रकरणी PMPML ने त्याला नोटीस पाठवली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 03, 2026 | 11:42 AM
Reel star Atharva Sudame controversy legal notice by PMPML for shooting without permission pune news

Reel star Atharva Sudame controversy legal notice by PMPML for shooting without permission pune news

Follow Us
Close
Follow Us:
  • पीएमपीएमएलची रिलस्टार अथर्व सुदामेवर कारवाई
  • परवानगीशिवाय रिल शूट केल्याप्रकरणी बजावली नोटीस
  • रिल डिलीट न केल्यास होणार कायदेशीर कारवाई
Atharva Sudame controversy : पुणे : सोशल मीडियावरील सुप्रसिद्ध रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. अथर्व सुदामे अनेकदा समाजातील वास्तवदर्शी परिस्थितीवर उपरोधक टीका करणाऱ्या रिल्स करत असतो. गणेशोत्सव, दिवाळी, ख्रिसमस अशा अनेक सणांमधील सत्य परिस्थिती त्याने रिलमधून मांडली आहे. त्याचबरोबर त्यांच्या हास्यविनोदाच्या व्हिडिओ देखील नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असतात. दरम्यान, रिलस्टार अथर्वने सार्वजनिक सेवा देणाऱ्या PMPML च्या बसमध्ये व्हिडिओ बनवल्यामुळे त्याच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळच्या बसमध्ये अथर्व सुदामेने व्हिडिओ शुट केला. पीएमपीएमलची कोणतीही परवानगी न घेता बसमध्ये रिल शुट केल्यामुळे रिलस्टार अथर्व सुदामेला नोटीस बजावण्यात आली आहे. अथर्वने महिलांचा अपमान होईल अशा पद्धतीची रिल शुट केल्यामुळे त्याचबरोबर कोणत्याही परवानगी शिवाय हे शुट केल्यामुळे पीएमपीएमलने शुक्रवारी (दि.02) रिलस्टार अथर्व सुदामेला नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर सदर रिल ही सोशल मीडियावर काढून टाकण्याचे देखील सांगण्यात आले असून सात दिवसांमध्ये लेखी उत्तर देण्याचे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर असे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील रिलस्टार अथर्व सुदामेला देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

पीएमपीएमलच्या मालकीच्या असणाऱ्या बसमध्ये अथर्व सुदामेने परवानगीशिवाय रिल शुट केली. त्याचबरोबर गणवेश, बिल्ला आणि ई-तिकीट मशीनचा कोणत्याही परवानगीशिवाय वापर केला. याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता रिल सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. या रिलमधून महिला प्रवाशांचा अपमान करण्यात आला असून त्यांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि मानसिक सुरक्षेला धक्का पोहचत आहे. तसेच या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वासाला तडा जात आहे. त्याचबरोबर पीएमपीएमलच्या प्रतिमेला गंभीर धक्का बसत असल्याचे देखील नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आज फुंकणार प्रचाराचे रणशिंग; मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लागले लक्ष…

याबाबत पीएमपीएमएलकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष पंकज देवरे यांनी मत मांडले आहे. पंकज देवरे म्हणाले की, “पीएमपीचा परिसर आणि मालमत्ता असलेल्या ठिकाणी शुटिंग करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज असते. मात्र रिलस्टार अथर्व सुदामे याने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्याचबरोबर एमपीएमएलच्या धोरणाच्या विरोधात असलेले कृत्य केले आहे. यामुळे पीएमपीची प्रतिमा डागाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे व्यावसायिक हित आणि सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास कमी होत आहे. सात दिवसांच्या आतमध्ये संबंधित चित्रिकरण काढून टाकले नाही आणि लेखी स्पष्टीकरण दिले नाही तर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट मत पंकज देवरे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Reel star atharva sudame controversy legal notice by pmpml for shooting without permission pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Instareel
  • PMPML
  • pune news

संबंधित बातम्या

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा
1

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
2

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
3

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार
4

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.