crime (फोटो सौजन्य: social media )
पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सख्ख्या मोठ्या भावाने आपल्याच लहान भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (24) असे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव अनिकेत दत्तात्रय नवले (26 ) असे आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
प्रवीण आणि अनिकेत हे दोघे बिबवेवाडी भागात राहतात. प्रवीण कामधंदा करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूसाठी पैसे मागून तो कुटुंबियांना त्रास द्यायचा. सोमवारी (14जुलै) सकाळी अनिकेत प्रवीणला समजावून सांगण्यासाठी गेला होता. दारू पियुन आम्हाला त्रास देऊ नको. असे त्याने प्रवीणला सांगितले. त्यावर प्रवीणने अनिकेट्सही वाद घातला. वादातून अनिकेतने प्रवीणवर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रहिवाशांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान प्रवीणचा मृत्यू झाला आहे. आरोपी अनिकेतला पोलिसांनी अटक केली असून पुढील करावी करण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्ज न फेडल्याने तो तरुणांवर अमानवी कृत्य करण्यात आलं आहे. केवळ पैसे वेळेवर न दिल्याने या दोघांना मुखमैथुन करायला लावले असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. एवढंच नाही तर त्यांनी पीडित तरुणांना निर्वस्त्र केले आणि त्यांचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. पीडित तरुणांपैकी एक अल्पवयीन असून १९ वर्षीय तरुण आहे. या घटनेननंतर पीडित मुलांपैकी एकाच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार सांगून तक्रार दाखल केली. या संतापजनक घटनेने खळबळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
पुढे आलेल्या माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी दिलीप गोस्वामी पीडित १९ वर्षीय मुलाला फसवून कारमधून पुण्याला नेले होते. या प्रवासादरम्यान कारमध्ये दिलिपचे मित्र धीरज, पंजूभाई गोस्वामी आणि भरत यांनी दोन्ही मुलांना मारहाण केली. मारहाणीत बेल्टचा वापर करण्यात आला. त्यानंतर ते पुण्यातून पुन्हा दक्षिण मुंबईतील भुलेश्वर भागात परतले. दरम्यान त्यांनी या दोन्ही पीडित तरुणांना घरात डांबून ठेण्यात आलं. तिथे देखील त्यांना मारहाण करण्यात आली. संतापजनक आणि धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी त्यांना ओरल सेक्स करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर या घटनेचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. मुख्य आरोपी दिलीप गोस्वामी उर्फ ऋतिकला अटक केली आहे. त्याचे तीन साथीदार धीरज, पंजुभाई गोस्वामी आणि भरत हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पीडित मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु असून या तरुणांची मानसिक स्थिती अतिशय नाजूक असल्याची माहिती आहे. सध्या त्यांना समुपदेशन केले जात आहे.
माजी नगरसेवकाच्या मुलाला अमली पदार्थासह अटक; कारसह 18.17 लाख रुपयांचा माल जप्त