
Thane
शिवसेना-भाजप महायुतीचे प्रभाग क्र. ४ ब चे उमेदवार मयूर पाटील यांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत ते समस्या जाणून घेत आहेत.समस्या सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. प्रचार रॅलींना मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उमेदवार मयूर पाटील हे प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसत आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी दशरथ गायकर यांनी या निवडणुकीत मयूर पाटील यांचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.