Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् महिलेसोबत पुढे जे घडलं ते धक्कादायक!

१० फेब्रुवारी रोजी खाणीत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 18, 2026 | 05:25 PM
Pune Crime News:  लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् महिलेसोबत पुढे जे घडलं ते धक्कादायक!
Follow Us
Close
Follow Us:
  • शफिया शेख यांचा मृतदेह १० फेब्रुवारी रोजी मांगडेवाडी परिसरातील एका क्रशर खाणीत आढळून आला
  • शफिया शेख ही महिला वेश्याव्यवसाय करायची
  • शफिया शेख ही महिला वेश्याव्यवसाय करायची
Pune Crime News:  शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेचा सहा जणांनी मिळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शफिया सलीम शेख (वय ४०, रा. दांडेकर पूल) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

शफिया शेख यांचा मृतदेह १० फेब्रुवारी रोजी मांगडेवाडी परिसरातील एका क्रशर खाणीत आढळून आला होता. संशयास्पद रित्या मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले.

Weather दिल्लीकरांसोबत खेळणार लपंडाव; आज पाऊस तर पुढील काही दिवस थेट…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफिया शेख ही महिला वेश्याव्यवसाय करायची. ८ फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होत्या. त्यावेळी आरोपी केशव कमलेश चौधरी (२०), सोन्या लक्ष्मण पवार (१८) आणि अब्दुल मोहम्मद शेख (२३) यांनी त्यांना पाहिले. तिघांनी शफिया यांना कात्रज येथील एका लॉजवर घेऊन जायचं ठरवले. मात्र लॉजवर न नेता त्यांना मांगडेवाडी येथील क्रशर खाणीजवळील डोंगरावर नेण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इतर आरोपी महादेव अर्जुन व्होरडे (४०), साई अमित पुजारी (१९) आणि सोहेल हनीफ खान (२०)  तेथे पोहोचले.

मृत शाफिया आणि आरोपी डोंगरावर मद्यपान करत असताना शफिया यांनी आपल्याला लॉजवर न नेता डोंगरावर का आणले, असा सवाल करत आरोपींसोबत वाद घातला.वाद वाढल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात शफिया यांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे ५० ते ५५ फूट खोल असलेल्या खाणीत त्यांना ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

Nanded News : नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली परीक्षा केंद्राची पाहणी; प्रशासनाकडून कॉपीमुक्ती अभियान सुरु

मृतदेह सापडल्यानंतर उलगडा

१० फेब्रुवारी रोजी खाणीत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Pune crime woman murdered by six bharti vidyapeeth police arrest accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.