Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : रुग्णालयाची बेफिकरी अन् पैशामुळे गर्भवतीचा मृत्यू; शिवसैनिकांनी आंदोलन करत अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर

Pune Deenanath Mangeshkar Hospital News : पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणानंतर आता शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 04, 2025 | 12:52 PM
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी; 11 जणांवर फौजदारी खटला दाखल

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी; 11 जणांवर फौजदारी खटला दाखल

Follow Us
Follow Us:

Pune Deenanath Mangeshkar Hospital News in Marathi : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती. महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर रुग्णाकडे उपचारांसाठी दहा लाखांची मागणी केली होती. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही प्रशासन महिलेला दाखल करण्यास तयार नव्हते.

शेवटी दूसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. याचदरम्यान आता शिंदे शिवसैनिकांकडून रुग्णालयावर चिल्लर फेकत संताप व्यक्त करण्यात आला.

Pune Crime News : घोडनदी पात्रातून कोट्यवधी किमतीचा अवैध वाळू उपसा सुरु; प्रशासनाकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने तनिषा भिसे पैशांच्या हव्यसापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूती वेदना तीव्र झाल्याने, महिलेला खाजगी गाडीने २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, पण वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत बिघडली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, गर्भवती महिलेचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.

या प्रकरणाबद्दल अधिक माहितीनुसार, भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली उर्फ ​​ईश्वरी उर्फ ​​तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या.सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांच्याकडे 10 लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा, अशी विनंती सुशांत भिसे यांनी केली. पण, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात गर्भवतीची तब्बेत खालावली आणि जीव गेला. याप्रकरणी आता उबाठा आणि शिंदे शिवसैनिकांडून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. तसेच रुग्णालयाच्या बाहेर चिल्लर फेकत संताप व्यक्त करण्यात आला.

हडपसरमधील कुख्यात गुंड टिपू पठाणवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Web Title: Pune deenanath mangeshkar hospital carelessness and pregnant woman death shinde shivsena angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • crime
  • Dinanath Mangeshkar Hospital
  • Pune

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
4

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.