Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Gas Explosion: खराडीत सिलेंडर स्फोटाची भीषण दुर्घटना; सिलेंडर बदलताना आग भडकली आणि एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील खराडी परिसरात गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाला. सिलेंडर बदलत असताना ही दुर्घटना घडली. तर पाच वर्षांच्या चिमुरडीसह दोन महिला थोडक्यात बचावल्या.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 06, 2026 | 11:36 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • खराडीतील फॉर्च्युन सिटी सोसायटीत गॅस स्फोटाची भीषण घटना.
  • परळीतील गिते कुटुंबातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू.
  • पाच वर्षांच्या चिमुरडीसह दोन महिला सुदैवाने बचावल्या.
पुणे: पुणे येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. खराडी भागात गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सिलेंडर बदलत असतांना अचानक आग भडकली आणि ही घटना घडली. खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी सोसायटीमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ही थरकाप उडवणारी घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

काय घडलं नेमकं?

खांदवेनगर परिसरातील एका घराच्या पहिल्या मजल्यावर स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर संपल्याने दुसरा सिलेंडर लावण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी अचानक गॅसची मोठी गळती होऊन सिलेंडरने पेट घेतला. पांडुरंग गिते यांनी प्रसंगावधान राखून पेटता सिलेंडर गॅलरीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच क्षणी घरात पसरलेल्या गॅसचा प्रचंड स्फोट झाला. या आगीत घरात असलेले विष्णू, पांडुरंग आणि वृंदावनी हे तिघेही गंभीररीत्या भाजले. त्याच वेळी सून राजेश्री या बाथरूममध्ये आणि पाच वर्षांची मुलगी निहारिका गॅलरीत असल्याने त्या दोघी या भीषण आगीतून सुखरूप बचावल्या.

Pune Crime: कुख्यात निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक, पोलीस कोठडीत सचिनची मोठी कबुली, म्हणाला…

उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू

या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. गंभीर जखमी झालेल्या तिघांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. विष्णू मुंजाजी गिते (वय 60), पांडुरंग विष्णू गिते (वय 35) आणि वृंदावनी विष्णू गिते (वय 55, सर्व सध्या रा. खांदवेनगर, खराडी, पुणे, मूळ रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी सदस्यांची नावे आहेत.या दुर्घटनेत राजेश्री पांडुरंग गिते आणि निहारिका पांडुरंग गिते (वय 5 वर्षे) या किरकोळ जखमी झाल्या असून त्या सुदैवाने थोडक्यात बचावल्या आहेत.हे कुटुंब कामानिमित्त पुण्यामध्ये स्थायिक झाले होते.

या स्फोटामुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि छताचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद चंदननगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक या दुर्घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Beed Crime: ‘तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं…’ लग्नानंतर 12 दिवसांत तलाठी तरुणाने संपवलं जीवन; पत्नीविरोधात गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: पुण्यातील खराडी परिसरातील फॉर्च्युन सिटी सोसायटीमध्ये ही दुर्घटना घडली.

  • Que: या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

  • Que: स्फोटाचे कारण काय होते?

    Ans: गॅस सिलेंडर बदलत असताना गॅस गळती होऊन प्रचंड स्फोट झाला.

Web Title: Pune gas explosion horrific cylinder explosion in kharadi fire broke out while changing the cylinder resulting in the deaths of three members of the same family due to severe burns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • crime
  • Pune

संबंधित बातम्या

Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य
1

Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड
2

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
3

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
4

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.