Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Pune MBBS Student Suicide: पुण्यातील कात्रज परिसरातील नॅन्सी लेक होम सोसायटीमध्ये 21 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीचा दहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. आदी माया शेखर रेड्डी असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती MBBSच्या द्वितीय वर्षात शिकत होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2026 | 06:47 PM
पुण्यात MPSCच्या 28 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये 18 ते 19 जणांचा उल्लेख

पुण्यात MPSCच्या 28 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये 18 ते 19 जणांचा उल्लेख

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या
  • परीक्षा सुरू असताना तणावात असल्याची माहिती
  • पुण्यातील नॅन्सी लेक होममध्ये दुर्दैवी घटना
पुणे : कात्रज परिसरातील नॅन्सी लेक होम सोसायटीमध्ये एका 21 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीचा दहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आदी माया शेखर रेड्डी (वय 21) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मूळची तिरूमलंगरी, हैदराबाद, तेलंगणा येथील रहिवासी होती. कात्रज येथे भावासोबत राहून ती MBBSच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती.

माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव

पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नॅन्सी लेक होम सोसायटीमध्ये एका तरुणीने दहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तरुणी घटनास्थळी गंभीर आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली.

Baramati Crime: ७ लाखांची मागणी… ५ लाख घेतले अन् पुढच्याच क्षणी गेम ओव्हर!

MBBSच्या दुसऱ्या वर्षात घेत होती शिक्षण

घटनेच्या वेळी तिचा भाऊ डॉ. आदी अदीम शेखर रेड्डी घटनास्थळी उपस्थित होता. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आदी माया ही MBBSच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती आणि भावासोबत कात्रज येथील फ्लॅटमध्ये राहत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. त्यामुळे ती तणावाखाली होती, अशी माहिती तिच्या भावाने पोलिसांना दिली. परीक्षेच्या तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्याने व्यक्त केला आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

कोणावरही संशय नसल्याचे भावाचे म्हणणे

या घटनेबाबत कोणत्याही व्यक्तीवर संशय नसल्याचेही तिच्या भावाने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव पुढील तपास करत आहेत.

पुण्यात MPSCच्या 28 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये 18 ते 19 जणांचा उल्लेख

तर दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा पुण्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणाची ओळख प्रथमेश देशमुख अशी झाली असून, तो मूळचा परंडा येथील रहिवासी होता. पुण्यातील नवी पेठ परिसरात भाड्याच्या घरात राहून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. प्राथमिक माहितीनुसार, प्रथमेशने आत्महत्या केली असून त्याच्यावर असलेल्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या कर्जाच्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

घटनास्थळी दोन पानी सुसाइड नोट

पोलिसांना घटनास्थळी दोन पानी सुसाइड नोट मिळाल्याची माहिती आहे. पोलीस उपायुक्त हृषिकेश रावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोटमध्ये प्रथमेशने ज्या 18 ते 19 व्यक्तींकडून पैसे घेतले होते, त्यांची नावे आणि तपशील नमूद केले आहेत. तसेच संबंधित व्यक्तींना किती रक्कम परत केली होती, याचीही नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र, प्रथमेशने एवढ्या व्यक्तींकडून पैसे का घेतले, कर्ज घेण्यामागचे नेमके कारण काय होते आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव होता का, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. यासंदर्भात त्याच्या कुटुंबीयांकडूनही माहिती घेतली जात आहे.

Pune: दहीहंडीच्या मंचावर अश्लील हावभाव; पोलिसांचा दणका! ८ डान्सर्ससह पुण्यातील आयोजकांवरही कारवाई

Web Title: Pune katraj 21 year old mbbs student dies by suicide exam stress suspected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Pune

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.