Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : ‘एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून’ दोन गटांत तुफान राडा; विटा-लाथाबुक्क्यांसह जोरदार दगडफेकीत दुचाकींचे नुकसान!

Pune Crime : केवळ एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून तरुणांच्या दोन गटांत तुफान राडा! विटा आणि लाथाबुक्क्यांच्या वर्षावाने हादरला दत्तनगर परिसर... पोलिसांनी कशी मिळवली परिस्थितीवर नियंत्रण?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 17, 2026 | 03:27 PM
Pune Crime : 'एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून' दोन गटांत तुफान राडा; विटा-लाथाबुक्क्यांसह जोरदार दगडफेकीत दुचाकींचे नुकसान!

Pune Crime : 'एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून' दोन गटांत तुफान राडा; विटा-लाथाबुक्क्यांसह जोरदार दगडफेकीत दुचाकींचे नुकसान!

Follow Us
Follow Us:
  • कात्रजच्यामध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान राडा
  • हिंसक दगडफेक व विटांच्या वर्षावात रस्त्यालगतच्या अनेक दुचाकींचे नुकसान
  • भारती विद्यापीठ पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत केला ११ जणांवर गुन्हा दाखल
Pune Crime : पुण्यातील कात्रज-गुजरवाडी परिसरातील दत्तनगर येथून एक अतिशय संतापजनक आणि धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. केवळ एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांतील तरुणांमध्ये वाद झाला आणि पाहतापाहता या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. दोन्ही गटांच्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात जमाव जमवून एकमेकांवर विटा, लाथाबुक्क्यांसह जोरदार दगडफेक केली. या थरारक आणि अनपेक्षित दगडफेकीमुळे परिसरामध्ये मोठा गोंधळ उडाला असून, रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: Mumbai local Train: विनातिकीट प्रवाशाच्या रागाचा फटका भलत्याच निरपराध नागरिकाला; मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

नेमकी काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास दत्तनगरमधील मंदीराजवळ हा सर्व प्रकार घडला. केवळ एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांतील तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली, जी काही वेळातच हिंसक वळणावर गेली. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे परिसरामध्ये एकच भगदड उडाली. रस्त्यावरून जाणारे सामान्य नागरिक तसेच स्थानिक रहिवासी प्रचंड भयभीत झाले होते. या तीव्र गोंधळात उपद्रवी तरुणांनी रस्त्यालगत उभ्या केलेल्या अनेक दुचाकींच्या गाड्यांची तोडफोड करत नुकसान केले.

हेही वाचा: Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..

पोलिसांची तात्काळ कारवाई आणि गुन्ह्याची नोंद

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने अत्यंत वेगाने सूत्रे हलवत आणि प्रसंगावधान दाखवत परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुमीत केंजळे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आणि हिंसाचार करणाऱ्या तब्बल ११ जणांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा वाद आणि राडा नेमका कुठे घडला?

    Ans: पुण्याच्या कात्रज-गुजरवाडी परिसरातील दत्तनगरमधील मंदीराजवळ हा प्रकार घडला.

  • Que: दोन गटांमध्ये हाणामारी होण्याचे कारण काय होते?

    Ans: केवळ एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांच्या तरुणांमध्ये हा वाद झाला होता.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणी काय काय कारवाई केली आहे?

    Ans: भारती विद्यापीठाच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पोलीस कर्मचारी सुमीत केंजळे यांच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pune katraj gujarwadi dattanagar clash stone pelting bharti vidyapeeth police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • crime news
  • pune crime news

संबंधित बातम्या

दौंड तालुक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; पोलिसांनी केली अटक
1

दौंड तालुक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; पोलिसांनी केली अटक

छाती, पोटावर चाकूचे वार अन् रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या
2

छाती, पोटावर चाकूचे वार अन् रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या

टोमणे, शिवीगाळ अन् मारहाण; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
3

टोमणे, शिवीगाळ अन् मारहाण; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले
4

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.