Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2026 | 11:46 AM
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले

Follow Us
Follow Us:
  • पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
  • २० हजारांची लाच स्वीकारताना अटक
  • पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
वडगाव मावळ/सतिश गाडे : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. नाथा रामकिसन केकाण (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास लोणावळा येथील मॅप्रो गार्डन परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (ii), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्याची कलमे कमी करण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने वेळोवेळी १ लाख ३० हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित गुन्ह्याचे दोषारोपपत्र (चार्जशीट) लवकर न्यायालयात पाठविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी तक्रारदाराकडे आणखी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड होऊन २० हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी लोणावळा येथील मॅप्रो गार्डन परिसरात सापळा रचला. सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास पंचांसमक्ष २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस उपनिरीक्षक नाथा रामकिसन केकाण (वय ३८) हे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, मावळ येथे कार्यरत आहेत. ते फ्लॅट क्रमांक ४०१, साई व्हिजन सोसायटी, भोंडवेबाग, रावेत, पुणे येथे राहण्यास आहेत. ते वर्ग-२ अधिकारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे करीत आहे.

लाचखोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप

मावळ तालुक्यात शासकीय कार्यालयांमधील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विविध कामांसाठी लाचेची मागणी होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामे करून घेण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असताना काही अधिकारी व कर्मचारी आर्थिक लाभासाठी नागरिकांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. मावळ तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही भ्रष्टाचाराच्या तक्रारी थांबताना दिसत नाहीत. काही अधिकारी-कर्मचारी पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक माया जमवत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षकावर झालेली ही कारवाई प्रशासनातील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना धडा मिळणार का? मावळ तालुक्यातील शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीला आळा बसणार का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथील पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस हवालदार वनिता गोरे, दगडू सोनवणे, पोलीस अंमलदार रवी दिवेकर आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा : हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

लाचेची मागणी झाल्यास १०६४ वर संपर्क साधा

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. लाचेची मागणी झाल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली?

    Ans: पोलीस उपनिरीक्षक नाथा रामकिसन केकाण (वय ३८) यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

  • Que: पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी किती रुपयांची लाच मागितली होती?

    Ans: गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर न्यायालयात पाठविण्यासाठी त्यांनी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे ठरले.

  • Que: लाच मागितल्यास नागरिकांनी कुठे तक्रार करावी?

    Ans: शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येते.

Web Title: A police sub inspector from the lonavala rural police station has been caught while accepting a bribe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Arrested News
  • Bribe Case
  • crime news

संबंधित बातम्या

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात
1

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार, तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; सहा आरोपी ताब्यात
2

हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार, तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; सहा आरोपी ताब्यात

नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ
3

नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ

बसस्थानकावर प्रवाशांना हेरून चोरी, महिलांच्या टोळीतील एकीला अटक; 3 गुन्हे उघड
4

बसस्थानकावर प्रवाशांना हेरून चोरी, महिलांच्या टोळीतील एकीला अटक; 3 गुन्हे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.