
दौंड तालुक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोनवडी गावच्या हद्दीतील कॉर्डलाईन ते पवार पॅलेस रोडवर ही घटना घडली. आरोपी दिनेश पवार याच्या मनात मागील दोन ते अडीच महिन्यांपूर्वी अरुण पवार याने आपल्या आईचा विनयभंग केल्याच्या कारणावरून राग होता. याच रागातून दिनेश पवार व त्याचा साथीदार रुपेश राठोड यांनी संगनमत करून अरुण पवार याला रस्त्यावर एकटे गाठले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात अरुण पवार याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयताचा भाऊ सुनील अनिल पवार (वय ३३, रा. सोनवडी) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एम. बिद्री करत आहेत.
1. सोनवडी येथे खून झालेल्या तरुणाचे नाव काय?
अरुण अनिल पवार (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे.
2. सोनवडी खून प्रकरणात किती जणांना अटक झाली?
दिनेश विजय पवार (वय २०) आणि रुपेश मिथुन राठोड या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
3. खून कुठे झाला?
सोनवडी गावच्या हद्दीतील कॉर्डलाईन ते पवार पॅलेस रोडवर हा खून झाला.