
छाती, पोटावर चाकूचे वार अन् रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या
ओम मंजुळ पवार (वय २१, रा. टाकरखेड हेलगा) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मोठा भाऊ गोपाल उर्फ संजय पवार याचे सुमारे वर्षभरापूर्वी वरदडा येथील कोमलशी लग्न झाले होते. दरम्यान, रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोपाल व त्याची पत्नी कोमल हे दुचाकीने पांढरदेव येथे तिची बहीण भाग्यश्री पवार हिला कपडे देण्यासाठी घरून निघाले होते. दरम्यान, दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कोमलने फिर्यादीच्या चुलत भावाच्या मोबाइलवर फोन करून आपण व अजय उर्फ गोट्या विजय पवार यांनी गोपाल पवार याच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. तसेच मृतदेह कव्हळा ते महिमळ गाडरस्त्यावर पडलेला असल्याचेही तिने सांगितले.
ही माहिती मिळताच ओम पवार, करण आसाराम पवार व मनोज आसाराम पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे गोपाल पवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याच्या उजव्या छातीवर, मानेखाली तसेच उजव्या हाताच्या खांद्याजवळ चाकूचे वार होते. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मृत गोपाल दोघांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून कोमल व अजयने त्याला एकटे गाठून चाकूने वार करून ठार केल्याचा आरोप फिर्यादीने केला.
पोलिसांची वेगवान कारवाई
घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगाने तपासचक्रे फिरवली. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बालाजी सानप व त्यांच्या पथकाने काही तासांतच संशयित आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अमडापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Ans: गोपाल उर्फ संजय मंजुळ पवार (वय २१, रा. टाकरखेड हेलगा, ता. चिखली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Ans: पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, गोपाल पवार हे कोमल पवार आणि तिचा प्रेमी अजय उर्फ गोट्या विजय पवार यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
Ans: या प्रकरणी कोमल पवार आणि तिचा प्रेमी अजय उर्फ गोट्या विजय पवार यांना संशयित आरोपी म्हणून अमडापूर पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले. दोघांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.