Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ
प्रांजल खेवलकरांना जामीन मंजूर
पुण्यातील रेव्ह पार्टीत झाली होती अटक
प्रांजल खेवलकर एकनाथ खंडसेंचे जावई
Pune Crime News: पुण्यातील खराडी येथे कथित रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना पुणे कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात पुणे कोर्टाने प्रांजल खेवलकर यांना जमिन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान आता या प्रकरणारत एक नवीनच माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला आहे.
खराडी येथे कथित रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांना पुणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यात आता फॉरेन्सिकचा रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या ड्रग्स प्रकरणात प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्सचे सेवन केले नसल्याचा खुलासा समोर आला आहे. प्रांजल खेवलकर आणि अन्य आरोपींनी ड्रग्सचे सेवन केले नसल्याचा रिपोर्ट पोलिसांकडे आल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील खराडी भागातील एका ड्रग्स पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. त्यात पोलिसांनी ड्रग्स जप्त केले होते. यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली होती. अखेर जवळपास दीड महिना तुरुंगात असलेल्या प्रांजल खेवलकरांना अखेर जामिन मिळाला आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न आणि अर्धनग्न फोटो, व्हिडिओ आढळले आहेत. महिलांना चित्रपटात काम देतो म्हणून बोलवून घेण्यात आल. लोणावळा, साकीनाका येथे पार्ट्या झाल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग देखील सापडले होते असे समोर आले होते.
Pune Drug Rave Party: खडसेंच्या जावयाबाबत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय; खेवलकरांना आता…
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, या प्रकरणात वैश्या व्यवसायासाठी बळजबरीने मुलींचा वापर, मानवी तस्करी, आर्थिक व्यवहार आणि हॉटेल मालकांच्या भूमिकेची सखोल चौकशी आवश्यक आहे. यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली होती. “सखोल चौकशी झाल्यास देशातील सर्वात मोठा घोटाला समोर येऊ शकतो,” असा दावा चाकणकर यांनी केला होता.