प्रांजल खेवलकरांना कोर्टाचा दिलासा प्रांजल खेवलकरांना कोर्टाचा दिलासा (फोटो- सोशल मीडिया/istockphoto)
एकनाथ खडसेंच्या जावयाला मोठा दिलासा
कथित पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात जामीन मंजूर
पुणे पोलिसांनी केली होती अटक
Pranjal Khewalkar: पुण्यातील खराडी येथे कथित रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. मात्र आता त्यांना पुणे कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात पुणे कोर्टाने प्रांजल खेवलकर यांना जमिन मंजूर करण्यात आला आहे.
पुण्यातील खराडी भागातील एका ड्रग्स पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. त्यात पोलिसांनी ड्रग्स जप्त केले होते. यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली होती. अखेर जवळपास दीड महिना तुरुंगात असलेल्या प्रांजल खेवलकरांना अखेर जामिन मिळाला आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न आणि अर्धनग्न फोटो, व्हिडिओ आढळले आहेत. महिलांना चित्रपटात काम देतो म्हणून बोलवून घेण्यात आल. लोणावळा, साकीनाका येथे पार्ट्या झाल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग देखील सापडले होते असे समोर आले होते.
Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार? रुपाली चाकणकरांनी केले ‘हे’ गंभीर आरोप
पती प्रांजल खेवलकरसाठी रोहिणी खडसेंची खास पोस्ट
शरद पवार गटाच्या महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली होती. यामध्ये रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबत फोटो शेअर केला. त्याचबरोबर संयम राखण्याचे देखील सांगितले. रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल ! जय महाराष्ट्र! अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या प्रकरणावर रोहिणी खडसे यांचे वडील एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून घडलेला प्रकार हा षडयंत्र असेल तर आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा दिला होता.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, या प्रकरणात वैश्या व्यवसायासाठी बळजबरीने मुलींचा वापर, मानवी तस्करी, आर्थिक व्यवहार आणि हॉटेल मालकांच्या भूमिकेची सखोल चौकशी आवश्यक आहे. यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली होती. “सखोल चौकशी झाल्यास देशातील सर्वात मोठा घोटाला समोर येऊ शकतो,” असा दावा चाकणकर यांनी केला आहे.