Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video Cab Driver:”माझी चूक काय? मला का मारताय?” ओला चालकाचा काळजाचा ठोका चुकवणारा आक्रोश! पुण्यात रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

Viral Video Cab Driver: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर! ४५० रुपयांच्या कॅब बिलावरून ओला चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत वीट-लाथांनी मारहाण; काळजाचा ठोका चुकवणारा आक्रोश "माझी चूक काय?" - पाहा, काय आहे नेमका प्रकार...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 10, 2026 | 01:50 PM
Viral Video Cab Driver:"माझी चूक काय? मला का मारताय?" ओला चालकाचा काळजाचा ठोका चुकवणारा आक्रोश! पुण्यात रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

Viral Video Cab Driver:"माझी चूक काय? मला का मारताय?" ओला चालकाचा काळजाचा ठोका चुकवणारा आक्रोश! पुण्यात रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात कॅब चालकाला ३ जणांनकडून बेदम मारहाण
  • ४५० रुपये बिलावरून वीट मारून केले रक्तबंबाळ
  • भारती विद्यापीठ पोलिसांत ३ जणांवर गुन्हा
Viral Video Cab Driver: राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून (Pune News) एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका ओला-उबेर कॅब (Ola-Uber Cab) चालकाला तीन जणांनी मिळून रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली आहे. भरचौकात घडलेल्या या थरारक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, पुणेकरांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॅब चालकाचा आक्रोश आणि मारहाण करणाऱ्यांची निर्दयता पाहून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल.

हेही वाचा: Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!

४५० रुपयांचे बिल पडले महागात!

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुमार गायकवाड असे मारहाण झालेल्या कॅब चालकाचे नाव आहे. एका प्रवाशाच्या पत्नीला पुण्यातील कात्रज चौकात सोडण्यासाठी त्यांनी ४५० रुपये भाडे घेतले होते. हे बिल जास्त वाटल्याच्या रागातून प्रवाशासह इतर दोन जणांनी गायकवाड यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तीन आरोपी गायकवाड यांना घेरून लाथाबुक्क्यांनी आणि चक्क विटांनी डोक्यात मारहाण करत आहेत. मारहाण इतकी भीषण होती की, गायकवाड यांचा चेहरा आणि कपडे रक्ताने माखले होते.

“माझी चूक काय?” – कॅब चालकाचा आक्रोश

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ओला-उबेर कॅब चालकाचा आक्रोश स्पष्टपणे ऐकू येत आहे. “मी कोणाची छेड काढली नाही, माझी काहीच चूक नाही… मला सांगा तुम्ही का मारताय? नेमकी माझी चूक काय? कॅबचे पैसे ऑनलाईन रिफ्लेक्ट होतात, त्यात माझी काय चूक?” असा सवाल तो सतत करत आहे. मात्र, आरोपींनी त्याची कोणतीच दयामाया न करता बेदम मारहाण सुरूच ठेवली. रस्त्यावरून जाणारे लोक हा प्रकार बघत राहिले, मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आलेले दिसत नाही, हे आणखीनच धक्कादायक आहे.

हेही वाचा: Best Bus Accident News: “अनियंत्रित बसने सिग्नलवर आणला प्रलय!” मुंबईतील लोढा जंक्शनवर बेस्ट बसचा भीषण अपघात, अनेक वाहने उद्ध्वस्त

भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेची गंभीर दखल घेत भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे ओला-उबेर आणि इतर टॅक्सी चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या असून, पोलिसांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील कॅब चालकाची मारहाण कुठे झाली?

    Ans: पुण्यातील कात्रज चौकात कॅब चालकाची मारहाण झाली.

  • Que: कॅब चालकाला मारहाण करण्याचे कारण काय होते?

    Ans: कॅब चालकाने पत्नीला सोडण्यासाठी ४५० रुपये बिल घेतल्याच्या रागातून मारहाण करण्यात आली.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Pune ola uber cab driver brutally beaten katraj viral video sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Cab Driver
  • pune crime case

संबंधित बातम्या

Acid Attack: पुण्यात जुन्या वादातून मित्राच्या अंगावर फेकले ॲसिड; झटापटीत चिमुकलीसह चौघेजण गंभीर जखमी!
1

Acid Attack: पुण्यात जुन्या वादातून मित्राच्या अंगावर फेकले ॲसिड; झटापटीत चिमुकलीसह चौघेजण गंभीर जखमी!

Pune Police Crime: “न्याय मागणाऱ्याला खाकीची लाठी!” पुण्यात मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात बेदम तुडवले…
2

Pune Police Crime: “न्याय मागणाऱ्याला खाकीची लाठी!” पुण्यात मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात बेदम तुडवले…

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…
3

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!
4

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.