Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Police Crime: “न्याय मागणाऱ्याला खाकीची लाठी!” पुण्यात मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात बेदम तुडवले…

Pune Police Crime: न्याय मागण्यासाठी आलेल्या नागरिकावर मद्यधुंद पोलिसाचा अत्याचार! पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात निरीक्षकाने तक्रारदाराला दारूच्या नशेत केली बेदम मारहाण; वैद्यकीय तपासणीत पोलखोल झाल्यानंतर खाकी वर्तुळात उडाली पळापळ!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 08, 2026 | 11:00 AM
Pune Police Crime: "न्याय मागणाऱ्याला खाकीची लाठी!" पुण्यात मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात बेदम तुडवले...

Pune Police Crime: "न्याय मागणाऱ्याला खाकीची लाठी!" पुण्यात मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात बेदम तुडवले...

Follow Us
Follow Us:
  • पोलीस ठाण्यात तक्रारदाराला मद्यधुंद पोलीस निरीक्षकाकडुन मारहाण
  • तक्रार न ऐकता ठाण्यातच धिंगाणा आणि शिवीगाळ
  • वैद्यकीय तपासणीत नशा सिद्ध झाल्याने गुन्हा दाखल
Pune Police Crime: अडचणीच्या वेळी पोलिसांकडे धाव घेणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल ही साधी अपेक्षा असते. मात्र, पुण्यातून एक अत्यंत संतापजनक आणि खाकी वर्दीला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी आलेल्या एका नागरिकाला मदत करण्याऐवजी, चक्क दारूच्या नशेत चूर असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांदवे यांच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Accident News: दिवाळीचा सण ठरला काळ! ५ डिसेंबरच्या लग्नाआधीच दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू!

तक्रारदाराचे ऐकले नाही, उलट घातला धिंगाणा

मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलीस ठाण्यात एक नागरिक आपली तक्रार नोंदवण्यासाठी आला होता. त्यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक राजेश खांदवे हे पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होते. खांदवे यांनी त्या नागरिकाचे म्हणणे ऐकून घेण्याचे तसदी घेतली नाही, उलट त्याला थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पोलीस ठाण्यातच प्रचंड आरडाओरडा करत गोंधळ घातला. या अमानुष आणि अनपेक्षित प्रकारामुळे हादरलेल्या पीडित तक्रारदाराने हिंमत दाखवत अखेर खांदवे यांच्याविरोधातच पोलिसांत तक्रार दाखल केली.

हेही वाचा: Dowry Death Vaijapur: सहा महिन्यांचा संसार अन् ५० हजारांचा हुंडा! छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ वर्षीय शुभांगीने संपवले जीवन…

वैद्यकीय चाचणीत पोलखोल, गुन्हा दाखल

याप्रकरणी अधिक माहिती देताना परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले की, आरोपी पोलीस निरीक्षक राजेश खांदवे यांना तत्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या चाचणीमध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले आहे. पोलीस दलाची मान खाली झुकवणाऱ्या आणि प्रतिमा मलीन करणाऱ्या या कृत्यामुळे निरीक्षक खांदवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर कडक विभागीय कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कोणत्या पोलीस ठाण्यात घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात घडली आहे.

  • Que: कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावर मारहाणीचा आरोप आहे?

    Ans: सहकारनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांदवे यांच्यावर हा आरोप आहे.

  • Que: मद्यप्राशन केल्याचे कसे उघडकीस आले?

    Ans: ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये पोलीस निरीक्षक राजेश खांदवे यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Pune police crime drunk police inspector beats complainant sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Latest pune news update
  • pune crime case

संबंधित बातम्या

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…
1

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…

Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!
2

Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!
3

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!

Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण
4

Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.