Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Acid Attack: पुण्यात जुन्या वादातून मित्राच्या अंगावर फेकले ॲसिड; झटापटीत चिमुकलीसह चौघेजण गंभीर जखमी!

Acid Attack: पुण्याच्या येरवडा भागात दिवसाढवळ्या ॲसिड हल्ल्याने उडाली खळबळ! जुन्या वादातून मित्राच्या अंगावर ॲसिड फेकताना झालेल्या झटापटीत चिमुकलीसह चौघेजण गंभीर जखमी; येरवडा पोलिसांची तत्परता, मुख्य आरोपी बेड्यांत!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 09, 2026 | 09:58 AM
Acid Attack: पुण्यात जुन्या वादातून मित्राच्या अंगावर फेकले ॲसिड; झटापटीत चिमुकलीसह चौघेजण गंभीर जखमी!

Acid Attack: पुण्यात जुन्या वादातून मित्राच्या अंगावर फेकले ॲसिड; झटापटीत चिमुकलीसह चौघेजण गंभीर जखमी!

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वादातून नितीन जाधवने मित्रावर फेकले ॲसिड
  • झटापटीत शिंतोडे उडाल्यामुळे दुचाकीस्वार व मुलीसह चौघे जखमी
  • येरवडा पोलिसांनी आरोपीला केली अटक
Acid Attack: ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्याच्या येरवडा परिसरातील रामनगर भागात एका अत्यंत संतापजनक आणि थरारक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या अंगावर ॲसिडसदृश द्रवपदार्थ फेकल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे कृत्य रोखत असताना झालेल्या झटापटीत बाटलीतील ॲसिडचे शिंतोडे रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वार आणि त्याच्या लहान मुलीच्या अंगावर उडाल्यामुळे एका चिमुकलीसह एकूण चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी त्वरित कारवाई करत मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे.

हेही वाचा: Fire Incident: “दिवाळीच्या दिव्यामुळे काळानं गाठलं!” धाराशिवच्या येडशीत भीषण अग्नितांडव; एकाच कुटुंबातील ६ जणांचा गुदमरून मृत्यू

नितीन जाधव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव

नितीन सुंदर जाधव (वय ५२, रा. पांढूलमाण वस्ती, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (६ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित्रा इंद्रपाल डग्ग्या (वय ५२, रा. रामनगर, येरवडा) आणि आरोपी नितीन जाधव हे दोघे परिचयाचे आहेत. सुमित्रा यांचा मुलगा हा नितीनचा मित्र असून, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. याच जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपी हातात ॲसिडसदृश पदार्थाची बाटली घेऊन सुमित्रा यांच्या घरासमोर आला. तिथे त्याने शिवीगाळ करत मुलावर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Pune Murder News: “दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोथरूड रक्तरंजित!” पूर्ववैमनस्यातून तरुणावर शस्त्राने सपासप वार अन्…

झटापटीत चिमुकलीसह चौघेजण झाले जखमी

सुमित्रा यांनी आरोपीच्या हातातील बाटली झटकण्याचा व ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीदरम्यान ॲसिडचे शिंतोडे आजूबाजूला उडाले, ज्यामुळे फिर्यादी महिला, तिचा मुलगा, तसेच तिथून जाणारा एक दुचाकीस्वार आणि त्याची लहान मुलगी असे एकूण चौघेजण गंभीर जखमी झाले. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची गंभीर दखल घेत येरवडा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि अवघ्या काही वेळातच आरोपी नितीन सुंदर जाधव याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ॲसिड हल्ल्याची ही घटना पुण्यातील कोणत्या भागात घडली?

    Ans: ही घटना पुण्याच्या येरवडा परिसरातील रामनगर भागात घडली आहे.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?

    Ans: पोलिसांनी मुख्य आरोपी नितीन सुंदर जाधव (वय ५२) याला अटक केली आहे.

  • Que: या दुर्घटनेत किती जण जखमी झाले आहेत?

    Ans: हल्ल्यादरम्यान झालेल्या झटापटीत ॲसिडचे शिंतोडे उडाल्यामुळे एका चिमुकलीसह एकूण चौघेजण जखमी झाले आहेत.

Web Title: Pune yerawada acid attack ramnagar nitin jadhav arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • Attack
  • Latest pune news update
  • maharashtra. pune crime
  • pune crime case
  • pune news update

संबंधित बातम्या

Payal Zambare Suicide Case: “घरातून जप्त केले ३५ तोळे सोने अन् मोबाईल!” अभियंता पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट…
1

Payal Zambare Suicide Case: “घरातून जप्त केले ३५ तोळे सोने अन् मोबाईल!” अभियंता पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट…

Pune Police Crime: “न्याय मागणाऱ्याला खाकीची लाठी!” पुण्यात मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात बेदम तुडवले…
2

Pune Police Crime: “न्याय मागणाऱ्याला खाकीची लाठी!” पुण्यात मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात बेदम तुडवले…

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…
3

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू
4

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.