
Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!
सफाई कर्मचारी कृष्णा लोट आणि ओमकार काळे हे कचरा गोळा करत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एका संशयास्पद पोत्यावर रक्ताचे डाग दिसले. पोतं उघडून पाहताच त्यात मानवी पाय आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रं वेगाने फिरवली. मृतदेहाचे डोकं आणि चेहरा नसल्यामुळे ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, मात्र रात्री साडेअकराच्या सुमारास मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. खून झालेल्या व्यक्तीचे नाव अनिल खाडे (वय ५०) असल्याचे समोर आले.
पोलिसांच्या कसून चौकशीत हा खून अत्यंत जवळच्या मित्रानेच केल्याचे निष्पन्न झाले. विष्णू कुंभार या नराधमाने दारूच्या नशेत झालेल्या वादातून अनिल खाडे यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे केले. धड नवी सांगवीतील विनायकनगर, गल्ली क्रमांक एकमध्ये तर दोन्ही पाय श्रीनगर, गल्ली क्रमांक तीनसमोर फेकून दिले होते. आरोपी विष्णू कुंभार याच्यावर यापूर्वी वाहनचोरीचा गुन्हाही दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अत्यंत क्रूर आणि थरारक घटनेने पुणे शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Ans: पुण्यातील पिंपळे गुरव आणि नवी सांगवी परिसरात ही घटना घडली आहे.
Ans: मृत व्यक्तीचे नाव अनिल खाडे (वय ५०) असून, त्याच्या मित्रानेच (विष्णू कुंभार) त्याची हत्या केली आहे.
Ans: कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील पोत्यात रक्ताने माखलेले मानवी पाय आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.