Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Navi Mumbai News: पुण्यातील पॅटर्नच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील ‘दंड वसुली’च्या पद्धतीवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. तगडे आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जाणारे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे या प्रकरणात ठोस निर्णय घेणार का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 26, 2026 | 02:44 PM
पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात निर्णय, नवी मुंबईत कधी?
  • ‘दंड वसुली’वर आयुक्त मिलिंद भारांबे ठोस पाऊल उचलणार का?
  • धाडसी निर्णयांसाठी ओळखले जाणारे मिलिंद भारांबे अ‍ॅक्शन घेणार?
सावन वैश्य, नवी मुंबई : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील वाहनधारकांची होणारी कोंडी लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी काही दिवसासाठी ‘एनफोर्समेंट हॉलिडे’ जाहीर केला आहे. सर्व ई-चलन मशिन्स मुख्यालयात जमा करून पोलिसांनी दंड वसूल करण्यापेक्षा रस्ते मोकळे ठेवण्यावर भर दिला आहे. पुण्याच्या या धडाकेबाज निर्णयाने राज्यभरात कौतुक होत असताना, आता नवी मुंबईतील जनता विचारत आहे— “सक्षम आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेले नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे असा निर्णय कधी घेणार?”

नवी मुंबईत नशामुक्त अभियानांतर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी अमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई करत कौतुकास्पद आणि उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ज्या प्रकारे त्यांनी नशामुक्त मोहिमेत कडक आणि ठोस निर्णय घेऊन शहराला दिलासा दिला, तसाच धाडसी आणि नियोजनबद्ध निर्णय नवी मुंबईच्या ट्रॅफिक समस्येबाबतही घेतला गेला, तर नवी मुंबईकरांसाठी ती अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब ठरेल.

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त

ठाणे बेलापूर रोड, खारघर टोल नाका ते रोडपाली, तुर्भे एमआयडीसी आणि पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या चौकांमध्ये दररोज तासंतास गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागतात. रस्त्यावर वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झालेले असताना, वाहतूक पोलीस मात्र वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंडात्मक कारवाया आणि पावती फाडण्यातच व्यस्त दिसतात. त्यामुळे पुणे पोलिसांप्रमाणेच नवी मुंबईतही सर्वसामान्य नियमभंगाच्या पावत्या फाडणे बंद करून केवळ वाहतूक नियमनाला प्राधान्य देणे काळाची गरज बनले आहे.

तंत्रज्ञान आणि ‘गुगल मॅप्स’च्या मदतीने ट्रॅफिक व्यवस्थापनाची गरज

केवळ ई-चलन मशिन्स बंद करून चालणार नाही, तर वाहतूक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. गुगल मॅप्सवरील ट्रॅफिक अलर्ट पाहून ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी (उदा. उल्वे, वाशी, कोपरखैरणे, किंवा पीक अव्हर्सच्या वेळी होणारे जॅम) दर्शवली जाते, तिथे तात्काळ वाहतूक पोलिसांची जोडी तैनात केली पाहिजे.

ठाणे व इतर भागात जसे तंत्रज्ञानावर आधारित नियोजन केले जात आहे, तसेच नवी मुंबईतही सकाळ-संध्याकाळच्या पीक अव्हर्समध्ये रेड झोन असलेल्या ठिकाणी थेट ‘ट्रॅफिक क्लिअरन्स’वर भर दिला पाहिजे.

रोज कमावून खाणाऱ्या सर्वसामान्यांना दंडाचा मोठा फटका

इ-चलन मशिन्सच्या माध्यमातून होणाऱ्या सततच्या दंडात्मक कारवाईचा सर्वाधिक फटका रोज कमावून खाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, रिक्षाचालकांना आणि नोकरदारांना बसत आहे. आधीच वाहतूक कोंडीत वेळ वाया जात असताना, वारंवार होणाऱ्या दंडांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर नाहक गदा येत आहे. त्यामुळे पोलिसांचा भर हा ‘दंडाधिकारी’ बनण्यापेक्षा ‘वाहतूक नियंत्रक’ बनण्यावर असावा.

गंभीर नियमभंगांवर कडक चाबूक हवाच!

पुण्याप्रमाणेच नवी मुंबईतही हा निर्णय लागू झाल्यास सामान्य वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल. अर्थात, मद्यपान करून वाहन चालवणे , बेकायदेशीर कॉर्नर पार्किंग, नो-एंट्रीत प्रवेश करणे किंवा जड वाहनांनी डावी लेन अडवणे अशा गंभीर आणि धोकादायक प्रकारांवर कडक कारवाई सुरूच ठेवली पाहिजे.

नवी मुंबईकरांना रोजच्या ट्रॅफिक जाममधून मुक्ती देण्यासाठी, नशामुक्तीप्रमाणेच ‘ट्रॅफिक कोंडीमुक्ती’ची मोहीम हाती घेऊन आयुक्त मिलिंद भारांबे पुण्याच्या धर्तीवर नवी मुंबईत ‘एनफोर्समेंट हॉलिडे’ आणि गुगल मॅप्स आधारित ट्रॅफिक मॅनेजमेंट लागू करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Navi Mumbai News: डी-मार्ट सर्कलपासून रेल्वे स्थानकापर्यंत वाहतूककोंडी; कर्मचारी नेमके कुठे? नागरिकांमध्ये नाराजी

Web Title: Pune pattern fine collection navi mumbai police commissioner milind bharambe action demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Pune
  • Pune Police

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा
1

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा

Navi Mumbai News: नवी मुंबईत रात्रीच्या फूड स्टॉल्सचा सुळसुळाट; हायवेवर सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा प्रश्न
2

Navi Mumbai News: नवी मुंबईत रात्रीच्या फूड स्टॉल्सचा सुळसुळाट; हायवेवर सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा प्रश्न

MPSC आंदोलनात रोहित पवारांचा पोलिसांना थेट अल्टिमेटम; ’15 मिनिटांत निर्णय घ्या, नाहीतर…’
3

MPSC आंदोलनात रोहित पवारांचा पोलिसांना थेट अल्टिमेटम; ’15 मिनिटांत निर्णय घ्या, नाहीतर…’

Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम
4

Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.