Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा

MPSC: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात असताना अन्य ठिकाणी शस्त्रांसह फिरणाऱ्यांवर तितकीच तत्परता दाखवली जात नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2026 | 07:28 PM
Pune MPSC Students Protest

Pune MPSC Students Protest

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार- रोहित पवार
  • एमपीएससी आंदोलनातील कारवाईवर आक्षेप
  • एस. एम. जोशी मार्गावरून हटणार नसल्याची भूमिका
MPSC/Rohit Pawar: एमपीएससीच्या कारभाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक असून, त्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. विद्यार्थ्यांवर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करत, आंदोलनासाठी एस. एम. जोशी मार्गावर पुन्हा परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाच्या ठिकाणाहून हटणार नसल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

विद्यार्थ्यांवर गंभीर स्वरूपाची कलमे लावण्यात आली असून, एफआयआरमधील दाव्यांबाबत प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असे पवार म्हणाले. ऋषी गांगर्डे हे संबंधित ठिकाणी उपस्थित नसतानाही त्यांचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत पुरविणार असल्याचे सांगत, पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक असल्याची टीका त्यांनी केली.

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

न्यायालयीन आदेशाचा दाखला देत पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची आणि त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्याची भूमिका न्यायालयाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनासाठी परवानगी मिळावी म्हणून पोलिसांना पत्र दिले असूनही अद्याप परवानगी मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

आधी परवानगी द्यायची आणि नंतर सरकारच्या दबावाखाली ती धुडकावून लावत विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करायचे, हा नेमका कारभार आहे तरी कसा? #MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला पुणे पोलिसांनी आधी परवानगी दिली होती. मात्र, स्वतः दिलेली परवानगी ग्राह्य न धरता सरकारचं ऐकून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे आज दुसऱ्यांदा सत्याग्रह आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी तीन अर्ज दाखल केले. #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
#MPSCPuneProtest
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2026

 संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन

एमपीएससीमधील कथित गैरप्रकार आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या मुद्द्यावरून सुरू असलेला लढा संविधानाच्या रक्षणासाठीही असल्याचे पवार म्हणाले. दिल्लीतील आंदोलनाला जाता येत नसल्यास नागरिकांनी पुण्यात येऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने कारवाई केल्यास सामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्रीपदासाठी आंदोलन सुरू असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना, आपला भर विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि एमपीएससीच्या कारभारावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशांवरही आक्षेप घेतला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात असताना अन्य ठिकाणी शस्त्रांसह फिरणाऱ्यांवर तितकीच तत्परता दाखवली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने कारवाई केल्यास सामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.

MPSC आंदोलनात रोहित पवारांचा पोलिसांना थेट अल्टिमेटम; ’15 मिनिटांत निर्णय घ्या, नाहीतर…’

एस. एम. जोशी मार्गावरच आंदोलन करण्याचा आग्रह

आंदोलनासाठी जागा बदलण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता, एस. एम. जोशी मार्गावरच आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका पवार यांनी मांडली. आंदोलनासाठी यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी परवानगी मिळाली होती. पुणेकरांना त्रास होऊ नये, रुग्णालये आणि रहिवासी भागांना अडथळा निर्माण होऊ नये, याचा विचार करूनच या जागेची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी यापूर्वी दिलेली परवानगी रद्द केली असली, तरी त्याच ठिकाणी पुन्हा परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली.

Web Title: Rohit pawar warning to pune police about mpsc students protest in pune bhimanwar resign tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Paper Leak
  • Pune Police
  • rohit pawar

संबंधित बातम्या

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण;  ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
1

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

MPSC आंदोलनात रोहित पवारांचा पोलिसांना थेट अल्टिमेटम; ’15 मिनिटांत निर्णय घ्या, नाहीतर…’
2

MPSC आंदोलनात रोहित पवारांचा पोलिसांना थेट अल्टिमेटम; ’15 मिनिटांत निर्णय घ्या, नाहीतर…’

MPSC Protest : आंदोलनात सदावर्तेंची एंट्री; ‘विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका’, थेट सुनावलं
3

MPSC Protest : आंदोलनात सदावर्तेंची एंट्री; ‘विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका’, थेट सुनावलं

Pune MPSC Students Protest: एस.एम. जोशी पुलावरील आंदोलन स्थळ रिकामे करा!; पुणे पोलिसांचे MPSC विद्यार्थ्यांना आदेश
4

Pune MPSC Students Protest: एस.एम. जोशी पुलावरील आंदोलन स्थळ रिकामे करा!; पुणे पोलिसांचे MPSC विद्यार्थ्यांना आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.