Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी शोधण्याचा करत होता बनाव, संतप्त ग्रामस्थांनी केली फाशीची मागणी

पुण्याच्या पिंपळवंडी परिसरात १० वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, संतप्त ग्रामस्थांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 20, 2026 | 11:08 AM
Pune Crime : १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी शोधण्याचा करत होता बनाव, संतप्त ग्रामस्थांनी केली फाशीची मागणी

Pune Crime : १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी शोधण्याचा करत होता बनाव, संतप्त ग्रामस्थांनी केली फाशीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • १० वर्षीय चिमुरडी बेपत्ता झाल्यानंतर तपास सुरू
  • शेजारी तरुणावर संशय; पोलिसांच्या चौकशीत प्रकरण उघड
  • संतप्त ग्रामस्थांचा महामार्ग रोखत कठोर शिक्षेचा आग्रह
काळ बदलत चालला आहे आणि यासोबतच लोकांच्या विकृतीतही वाढ होत आहे. नरसापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर आरोपींच्या मनात भिती बसेल आणि बलात्काराचे प्रमाण कमी होईल अशी आशा होती, परंतु कायद्याला वेशीवर टांगून सामान्य माणूसही आता वाईटाची वाट पकडू लागला आहे. पुण्याच्या पिंपळवंडी परिसरातून बलात्कार आणि हत्येची नवीन घटना समोर येत आहे. आरोपीने चाैथी वर्गातील विद्यार्थीचे लैंगिक शोषण करुन गळा दाबत तिची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांनी आरोपीला फाशीला लटकवण्याची मागणी केली आहे. रहिवाशांनी महामार्ग रोखला असून पोलिसांना १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आरोपीला फाशी दिल्याशिवाय आणि मुलीला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही, असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले.

धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

२५ वर्षांच्या शेजाऱ्याने केले दुष्कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचा बलात्कार आणि हत्येच्या या प्रकरणात पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या २५ वर्षांच्या तरुणाला संशयाच्या जोरावर अटक केली आहे. माहितीनुसार, आरोपीने ओळखीचा फायदा घेत मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. पोलिसांनी सांगितले की, मुलगी बेपत्ता आहे असं समजून जेव्हा तिचा शोध घेतला जात होता तेव्हा संशयित यात सामील होता. त्याच्या कृतीतून पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि लगोलग आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चाैकशी करायला सुरुवात केली. पोलिसांच्या या चाैकशीतच खरं प्रकरण उघडकीस आलं.

पिडित मुलगी ही शेतमजूर घरातील होती. सुरुवातील तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नंतर गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. १० वर्षांची ही चिमुरडी आजारी असल्याने मंगळवारी शाळेत गेली नव्हती. पोलिसांचा अंदाज आहे की, दुपारी घरी आई-वडिल नसताना आरोपीने याचा फायदा घेतला आणि तिच्यासोबत दुष्कृत्य केले.

आरोपीच्या जबाबाने मृतदेह सापडला

कुटुंबीय जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना घरात मुलगी आढळली नाही. अशात कुटुंबाने आजूबाजूला, नातेवाईकांकडे मुलीची चाैकशी केली. बराच वेळ शोधूनही जेव्हा मुलगी सापडली नाही तेव्हा आलेफाटा पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडून शोधमोहिम सुरु असताना आरोपी देखील त्यांच्यात सामील होऊन मुलीचा शोध घेत असल्याचा बनाव करत होता. तथापि, त्याच्या कृतीतील विसंगता पाहून पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि खरं सत्य उघडकीस आलं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चाैकशीदरम्यान संशयित आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर लेंडे स्थळ परिसरातील एका नाल्याजवळील झाडाखालून मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि त्याने मुलीची हत्या आणि बलात्कार केल्याने स्पष्ट केले. पोलिसांनी सध्या मुलीच्या मृतदेहाला ताब्यात घेतलं असून शवविच्छेदनासाठी मृतदेहाला रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. फाॅरेंसिक टीमने घटनास्थळी जाऊन आवश्यक ते पुरावे गोळा केले असून आरोपीचा जबाब आणि या पुराव्यांच्या आधारावरच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तलावाभोवतीची अतिक्रमणे हटवा; प्रभावशाली व्यक्तींचीही गय करू नका, हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी व्यक्त केले दु:ख

या प्रकरणाविषयी दु:ख व्यक्त करताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी अशी विनंती केली. तसेच, सरकार पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असून, त्या लवकरच कुटुंबाला भेटण्यासाठी पिंपळवंडीला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Pune pimpalwandi 10 year old girl case neighbour arrested villagers protest demand justice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • crime news
  • Girl Murder
  • pune crime case

संबंधित बातम्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
2

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…
3

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट
4

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.