
नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ
निवडणुकीतील उमेदवारीवरून वाद
गुलिस्तानगर येथील महिला नगरसेविकेच्या सासूला एआयएमआयएम पक्षाकडून निवडणुकीचे तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न पती करीत होता. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याने सासूला उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर आरोपी खिजर अली याने नगरसेविकेला उमेदवारीचे तिकीट मिळवून दिले. निवडणुकीत ती विजयी झाल्यापासून सासू तिच्यावर नाराज होती. तसेच, निवडणुकीतील विजयाचे श्रेय मुलाला देत ती नगरसेविकेला वारंवार टोमणे मारत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
माहेरी गेल्यानंतरही पाठलाग
या घटनेनंतर नगरसेविकेचे मामा तिला माहेरी घेऊन गेले. तेथून उपचारासाठी रुग्णालयात जाण्याच्या तयारीत असताना आरोपी पुन्हा तेथे आले. त्यांनी नगरसेविकेच्या नातेवाइकांवर दगडफेक करून हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी पती, भासरा, दीर, सासू यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : बसस्थानकावर प्रवाशांना हेरून चोरी, महिलांच्या टोळीतील एकीला अटक; 3 गुन्हे उघड
जेवणावळीवरून वाद गेला विकोपाला
घटनेच्या दिवशी नगरसेविका आणि तिच्या पतीने समधी तसेच माहेरच्या मंडळींना जेवणासाठी घरी बोलावले होते. यावेळी सासूने नगरसेविकेच्या आईशी वाद घालत, मुलाच्या मदतीमुळेच तिचा निवडणुकीत विजय झाल्याचे सांगितले. तसेच, स्वतःकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने निवडणूक लढविता आली नसल्याचा उल्लेख केला. यावरून वाद वाढला. संतापलेल्या सासूने नगरसेविकेचा गळा आवळून तिला मारहाण केली. त्यानंतर आरोपी खिजर अली याने नगरसेविकेचा हात पकडून तिला चापटा मारल्या. पती आहद अली यानेही तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. यावेळी रेहान आणि अख्तर हे तलवार व चाकू घेऊन तेथे आले. त्यांनी नगरसेविकेच्या दिशेने धाव घेत हल्ल्याचा प्रयत्न केला. याचवेळी खिजर अली याने नाली साफ करण्याच्या लोखंडी फावड्याने तिच्या उजव्या हातावर वार केला. तसेच रेहान याने लोखंडी गेट तिच्या अंगावर ढकलल्याने तिच्या पायाला दुखापत झाली.
Ans: निवडणुकीतील उमेदवारी आणि विजयाच्या श्रेयावरून सासरच्या मंडळींमध्ये वाद झाला. त्यातून नगरसेविकेला मारहाण करून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.
Ans: सासूने गळा आवळून मारहाण केली. तसेच चाकू आणि तलवार घेऊन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. लोखंडी फावड्याने हातावर वार करण्यात आला असून, लोखंडी गेट अंगावर ढकलल्याने पायाला दुखापत झाली.
Ans: नगरसेविकेच्या तक्रारीवरून पती, सासू, जेठ, दीर यांच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध नागपुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.