Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swargate Case: स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या कोठडीसाठी पोलिसांचे प्रयत्न; कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दत्तात्रय गाडेला अटक केली. या गुन्ह्यात गाडेला २८ फेब्रुवारीला अटक केल्यानंतर त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2025 | 09:13 PM
Swargate Case: स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या कोठडीसाठी पोलिसांचे प्रयत्न; कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Swargate Case: स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या कोठडीसाठी पोलिसांचे प्रयत्न; कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा ताबा मिळवण्याचा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे. एका तपासणीसाठी पोलिसांना गाडेची एक दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे. त्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दत्तात्रय गाडेला अटक केली. या गुन्ह्यात गाडेला २८ फेब्रुवारीला अटक केल्यानंतर त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांना १४ पैकी १२ दिवस आरोपीची कोठडी मिळाली होती. पण उर्वरित दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत पोलिसांनी त्यास न्यायालयीन कोठडी मिळावी, असा अर्ज यापूर्वी न्यायालयात दिला होता.

आता तपासात काही नवीन माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आरोपीकडे चौकशी करण्यासाठी त्याचा ताबा मिळण्याकरिता पोलिसांनी दोनवेळा न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. त्यामुळे आता पोलिसांनी याबाबत अपील केले. त्यावरील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे.

आरोपीच्या वकिलांना गाडेला भेटायची परवानगी 
आरोपीला हजर केल्यानंतर त्याच्याशी न्यायालय परिसरातच बोलण्यासाठी परवानगी देण्याची मागणी, त्याचे वकील अॅड. वाजेद खा-बिडकर यांनी केली होती. नंतर आरोपीची कारागृहात रवानगी झाल्यावर कारागृहात जाऊन त्याची समोरासमोर मुलाखत घेण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. ॲड. बिडकर यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर करत गाडेला भेटण्याची परवानगी दिली आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पिडीतेचे सचिवांना पत्र

अत्याचार प्रकरणात पिडीत तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून अ‍ॅड. आसिम सरोदे यांनाच विशेष सरकारी वकिल म्हणून नेमावे, अशी मागणी केली आहे. त्यासोबतच पुणे पोलिसांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. धक्कादायक म्हणजे, त्या पहाटे आरोपी गाडेने दोनदा अत्याचार केल्यानंतर पुन्हा तिसऱ्यावेळी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार विरोधानंतर तो नराधम गाडे पळून गेला, असे तिने सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हंटले आहे.

Swargate Bus Depo Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम गाडेचा कोठडीचा अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

मी, ओरडले… पण ते आठवले अन् घाबरले

तरुणीने पत्रात म्हटले की, घटनेच्या वेळी मी ओरडली, पण, माझा आवाज बसला आणि निघेनासा झाला. त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली. अनेकांना दिलेला त्रास आठवला. त्यामुळे जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे वाटले, म्हणून मी शांत राहिले असेही तिने म्हंटले आहे.

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने दोन वेळा अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलिसांत आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला होता. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पुणे पोलिसांनी गुनाट या गावातील शेतात लपून बसलेल्या आरोपी गाडेला बेड्या ठोकल्या.

Web Title: Pune police appeal to session court for swargate case accused datta gade one day police custody crime pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 09:13 PM

Topics:  

  • crime news
  • Datta Gade
  • Pune Police
  • Swargate Case

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
3

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
4

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.