Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

आरोपी तरूण मुलांना व्यवसनाधीन करून त्यांना गुन्हेगारी टोळीत सामील करत होते. त्यानुसार, गुन्हेगारी संघटना वाढविण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2024 | 09:53 PM
Pune Crime News: दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime News: दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: दहशत माजविणार्‍या तसेच ड्रग्जमधून पैसा कमवत त्यातून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या कात्रजमधील चूहा गँगवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. आंबेगाव पोलिसांनी ही कारवाई केली असून, टोळीचा म्होरक्या तौसिफ उर्फ जमीर सय्यद उर्फ चूहा याच्यासह चौघांचा यात समावेश आहे. टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आरोपींनी अंमली पदार्थांची खरेदी विक्री, खूनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी सारखे गंभीर गुन्हे केले आहेत.

टोळीप्रमुख तौसिफ जमीर सय्यद उर्फ चूहा (२८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (३५), मार्कस डेव्हीड इसार (२९), कुणाल कमलेश जाधव (२५) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख तौसीफ उर्फ चूहा याने त्याच्या अन्य साथीदारांसह स्वतःच्या नेतृत्वाखाली संघटीत टोळी तयार केली. या टोळीची कात्रज तसेच आंबेगाव भागात दहशत होती. त्यांनी अनेक गंभीर गुन्हे केले.

आरोपी तरूण मुलांना व्यवसनाधीन करून त्यांना गुन्हेगारी टोळीत सामील करत होते. त्यानुसार, गुन्हेगारी संघटना वाढविण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांच्या वर्तणूकीत सुधारणा होत नसल्याने आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झीने यांनी तयार केला. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत हा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पाठविला होता. पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त राहूल आवारे पुढील तपास करीत आहेत.

कामगाराला भोसकून लुटण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

पुणे स्टेशन परिसरात हॉटेल कामगाराला भोसकून त्याच्याकडील रोकड लुटण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गौरव भारत धोकडे (वय १९), आकाश बाळू कांबळे (वय १९, दोघे रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात आत्माराम धर्मा आडे (वय ४२, रा. अशोकनगर, येरवडा, मूळ रा. आर्णे, जि. यवतमाळ) जखमी झाले आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुण्यात गुन्हेगारी वाढली! कामगाराला भोसकून लुटण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

आडे क्वीन्स गार्डनमधील एका क्लबच्या आवारातील हॉटेलमध्ये वेटर आहे. सोमवारी मध्यरात्री काम संपवून ते घरी निघाले होते. स्टेशन परिसरातील अलंकार टॉकीजजवळ ते रिक्षाची वाट पाहत थांबले होते. तेव्हा आरोपी धोकडे आणि कांबळे दुचाकीवरुन आले. त्यांनी आडे यांच्याकडे ५०० रुपये मागितले. आडे यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील कोयता काढून पोटाला लावला. कोयत्याने भोसकून आरोपी पसार झाले. जखमी अवस्थेतील आडे यांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे दिली. पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तपास करुन पसार झालेल्या आरोपींना पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: Pune police file mocca act aginst chuha gang drugs pune marathi crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 09:53 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पुण्यात गुंडाराज ! पोलिसाला काठीने बेदम मारहाण; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
1

पुण्यात गुंडाराज ! पोलिसाला काठीने बेदम मारहाण; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

सायबर चोरांचा डिजिटल हल्ला ! नऊ महिन्यांत अब्जावधींची लूट; धक्कादायक आकडेवारी समोर
2

सायबर चोरांचा डिजिटल हल्ला ! नऊ महिन्यांत अब्जावधींची लूट; धक्कादायक आकडेवारी समोर

Pune Crime: ड्यूटीवरून घरी जाणाऱ्या पोलिसावर कोयत्याने वार, पुण्यातील लॉ कॉलेजरोड वरील घटना
3

Pune Crime: ड्यूटीवरून घरी जाणाऱ्या पोलिसावर कोयत्याने वार, पुण्यातील लॉ कॉलेजरोड वरील घटना

प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी…; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी
4

प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी…; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.