Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले

हवेत गोळीबार केल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी वखार महामंडळाजवळ तरुणावर गोळीबार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 08, 2026 | 06:10 PM
गोळीबार करणाऱ्या 'त्या' दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले

गोळीबार करणाऱ्या 'त्या' दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:
  • गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या
  • पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले
  • एक विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त
पुणे : हवेत गोळीबार केल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी वखार महामंडळाजवळ तरुणावर गोळीबार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली असून, त्यांना नांदेडसिटी परिसरातून पकडले आहे. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल तसेच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

 

साहिल महेंद्रसिंग चव्हाण व बालाजी रामजी उमाप (रा. स्वारगेट) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या गोळीबारात मोजेश शेखापुरे हा तरुण जखमी झाला होता. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे व अंमलदार पोलिस हवालदार दयानंद तेलंगे, पोलिस अमलदार मयूर भोकरे, अमर पवार, राजेंद्र लांडगे, रणजीत फडतरे, रहीम शेख यांनी केली आहे.

स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही तरुणांनी हवेत गोळीबार करून दहशत माजवली होती. टोळ्यांमधील संघर्षातून प्रकार घडला होता. यानंतर दोन दिवसांपुर्वी या गोळीबाराचा बदला म्हणून काही टोळक्याकडून मार्केटयार्ड परिसरातील वखार महामंडळ परिसरात मोजेश या तरुणावर गोळीबार केला होता. यात मोजेश जखमी झाला होता. त्यानंतर टोळके पसार झाले होते. दरम्यान, या टोळक्याचा शोध पोलिस घेत होते.

यादरम्यान, पोलिस हवालदार दयानंद तेलंगे व पोलिस अमलदार मयूर भोकरे यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, दोन्ही आरोपी नांदेड सिटी गेटजवळ जोगेश्वरी येथील मागील बाजूस लपून बसले आहेत. तसेच त्यांच्याजवळ गोळीबारावेळी वापरलेले पिस्तूल असून ते पोलिस पथकावर गोळीबार करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने या भागात चारही बाजूने सापळा रचला. त्यानूसार, पथकाने चारही बाजूने छापा टाकून या दोघांना पकडले.

दरम्यान त्यांच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींकडे विचारपूस करून गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन दुचाकी शोधून जप्त करण्यात आली आहे. त्यांना मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याचा संशय; उत्तमनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

Web Title: Pune police have arrested two people involved in the shooting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
1

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
2

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
3

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
4

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.