Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केट यार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार; धक्कादायक कारणही समोर

वैमनस्यातून एकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना मार्केट यार्ड भागात शुक्रवारी रात्री घडली आहे. गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 08, 2026 | 02:10 PM
मार्केट यार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार; धक्कादायक कारणही समोर

मार्केट यार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार; धक्कादायक कारणही समोर

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली
  • मार्केट यार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार
  • धक्कादायक कारणही समोर
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. वैमनस्यातून एकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना मार्केट यार्ड भागात शुक्रवारी रात्री घडली आहे. गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरातील दोन टोळ्यांमधील वर्चस्वातून गाेळीबार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

 

या प्रकरणी सराइतांसह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्यापूर्वी गुलटेकडीत अल्पवयीनांनी पिस्तुलातून गोळीबार करुन दहशत माजविल्याची घटना घडली होती. मोझेस शेकापुरे उर्फ मोझ्या (वय २२, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बालाजी उमाप, राम उमाप यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत उमाप टोळी आणि अमित शेकापुरे यांच्यात वर्चस्वातून वाद आहे. शुक्रवारी दुपारी बालाजी उमाप आणि अमित शेकापुरे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी (६ मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारास अमित शेकापुरे याचा भाऊ मो्झेस आणि त्याचा मित्र हे दुचाकीवरुन मार्केट यार्डातील वखार महामंडळाकडून गंगाधाम चौकाकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या मागावर असलेले आरोपी बालाजी उमाप, राम उमाप आणि चार ते पाच साथीदार दुचाकीवरुन आले. हल्लेखोरांनी शेकापुरे आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. उमाप याने पिस्तुलातून गोळीबार केला. गोळी शेकापूरे याच्या पाठीत शिरल्याने तो गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या शेकापुरेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखाेरांना शेकापुरे याच्याबरोबर असलेल्या मित्रावर गोळीबार करायचा होता. मात्र, गोळीबारात शेकापुरे जखमी झाल्याची माहिती तपासात मिळाली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Web Title: A shocking incident has taken place in the market yard area of pune where a person was shot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
2

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
3

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
4

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.