
bank fraud
‘उएनो’ नावाच्या एका प्रमुख डिजिटल बँकेच्या दिवाळखोरीमुळे पराग्वेमध्ये गंभीर राजकीय आणि आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. बँकेच्या घोटाळ्यामुळे आणि अर्थी अस्थिरता निर्माण जलेने देशात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आणि रंग पाहायला मिळत आहे. याच संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन संसदेने राष्ट्राध्यक्ष सैंटियागो पेना यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव संमत केला आणि त्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची कारवाई केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, माजी राष्ट्राध्यक्ष सैंटियागो पेना यांच्यावर लावण्यात आलेले अंतिम आणि औपचारिक आरोप नक्की करेपर्यंत ते नजर कैदेत असणार आहेत. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईकहा फास आवळण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्धची कायदेशीर कारवाई लवकरच पूर्ण केली जाणार आहे.
या घटनेनंतर पराग्वेची राजधानी असुनसियोन येथील पेना यांच्या निवासस्थानाबाहेर संतापलेल्या शेकडो निदर्शकांनी गर्दी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे. कडेकोट सुरक्षेत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
पराग्वेमधील ‘उएनो’ ही एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रमुख डिजिटल बँक होती. या बँकेचे तब्बल २९ लाख ग्राहक होते. विशेष म्हणजे, पराग्वेची एकूण लोकसंख्या सुमारे ६१ लाख आहे, म्हणजेच देशातील जवळपास अर्धी लोकसंख्या या ना त्या कारणाने या बँकेशी जोडली गेली होती. या बँकेची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली असल्याचे समोर आले. मध्यवर्ती बँकेने तातडीने हालचाल करत डिजिटल बँकेचा ताबा आपल्याळकडे घेतला. त्यामुळे याचा फटका सामान्य जनतेला बसला.
अकाऊंट फ्रीज झाल्याने नागरिकांना त्यांचे पैसे काढणे कठीण झाले. अचानक खाती बंद झाल्यामुळे आणि पैसे काढता येत नसल्यामुळे पराग्वेमध्ये गंभीर आर्थिक संकट उभे राहिले.लाखो नागरिकांचा पैसा अडकल्याने देशामध्ये तीव्र संताप उसळला. जनतेच्या रोषाचा सामना करताना राजकीय व्यवस्थेवरही मोठा दबाव आला, ज्याचा परिणाम म्हणून अखेर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सैंटियागो पेना यांना महाभिवोगाला सामोरे जावे लागले आणि त्यांच्यावर नजरबंदीची कारवाई करण्यात आली आहे.
Ans: उएनो बँकेची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली असल्याने सामान्य जनतेला फटका बसला.
Ans: सैंटियागो पेना यांना त्यांच्या निवासस्थानी नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.