पुणे: नायलॉन तसेच चायनिज मांजावरील कारवाई तीव्र करत पोलिसांनी शहरातील सहकारनगर, चतुःश्रुंगी, विश्रांतवाडी, वारजे आणि मार्केटयार्ड भागातील पाच नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्यावर संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून ३६ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मकरसंक्राती सणाच्या निमित्ताने शहरात पतंग उडविले जातात. मात्र, यासाठी घातक अशा नायलॉन मांजाचा वापर करतात. या मांजामुळे पशु – पक्ष्यांसह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हा मांजा विकणे बेकायदेशीर आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केल्या होत्या. त्यानूसार विविध भागात पोलिसांनी कारवाई करून नायलॉन मांजा जप्त केला.
या पाच विक्रेत्यांवर कारवाई
सहकारनगर पोलिसांनी राहूल शाम कांबळे (१९) याच्यावर गुन्हा दाखल करून १८ हजारांचा मांजा जप्त केला. तर, चतुःश्रुंगी पोलिसांनी इलियास सलीम शेख (४२) याच्यावर कारवाई करून १४ हजार २०० रुपयांचा मांजा, विश्रांतवाडी पोलिसांनी मयूर महादेव अनारसे (३४) याच्यावर कारवाई करून सतराशे रुपयांचा मांजा, वारजे माळवाडी पोलिसांनी सिद्धार्थ संतोष वखारे (१९) याच्यावर कारवाई करून पाचशे रुपये िंकमतीचा मांजा आणि मार्वेâटयार्ड पोलिसांनी धनंजय चंद्रकांत मोहोळ (२६) याच्यावर कारवाई करून २ हजार ४०० रुपयांचा मांजा जप्त केला. एकूण पाच आरोपींवर कारवाई करून एकूण ३६ हजार ८२० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.
पुण्याच्या कोथरूडमध्ये चोरट्यांचा उच्छाद
कोथरूड परिसरातील मयूर कॉलनीत कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. मयूर कॉलनी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. याबाबत एका व्यक्तीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार मयूर कॉलनी परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय ८ जानेवारी रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी बंद फ्लॅट कुलूप तोडले. तसेच बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी चार लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
हेही वाचा: Pune Crime News: पुण्याच्या कोथरूडमध्ये चोरट्यांचा उच्छाद; साडे चार लाखांचा ऐवज लंपास
तक्रारदार दोन दिवसांपूर्वी बाहेरगावाहून परतले. तेव्हा फ्लॅट कुलूप तुटल्याचे लक्षात आले. त्यांनी फ्लॅटची पाहणी केली. तेव्हा फ्लॅटमधून ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सहायक आयुक्त भाऊसाहेब पठारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.
खडकी बाजार परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील २ लाख २७ हजारांचे दागिने चोरून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, पैसे देण्यासाठी पर्स काढल्यानंतर त्यांच्यामधील ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात ४१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे.