
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
२४ नोव्हेंबर 2024 रोजी पीडितेच्या विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस सगळं सुरळीत होत मात्र अवघ्या पहिल्या महिन्यातच सासरकडून छळाला सुरुवात झाली असा आरोप तिने तक्रारी केला आहे. पती राजदीप, सासरे प्रदीप आणि सासू हेमलता यांनी छोट्या-छोट्या कारणांवरून शिवीगाळ करणे, उपाशी ठेवणे तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास देणे सुरू केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
३ लाख रुपये दिले
शेअर मार्केटमध्ये झालेल्या तोट्याचे कारण देत सासरकडील मंडळींनी पीडितेकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. या दबावाखाली विवाहितेला वडिलांकडून 3 लाख रुपये आणण्यास भाग पाडण्यात आले. इतकेच नव्हे तर दिवाळीच्या सणादरम्यान पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याचेही तिने सांगितले.
पैसे आणले नसतील तर घरात…
सासरच्या मंडळींनी १-२ महिने पीडितेला सासरी येऊ दिले नाही. त्यानंतर २१ डिसेंबर २०२५ रोजी ती सासरी परत आली तेव्हा “पैसे आणले नसतील तर घरात येऊ नको” अशी धमकी देण्यात आली. आणि घरात येऊ दिले नाही. तर सासरा प्रदीप याने पीडितेला बेल्टने बेदम मारहाण देखील केले. पती राजदीपने बुक्के आणि लाथांनी मारहाण केली आणि सासू हेमलताने देखील मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत पीडित गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार करण्यात येत आहे.
कठोर कारवाईची मागणी
पोलिसांनी या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Ans: पिंपरी-चिंचवड परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
Ans: 24 नोव्हेंबर 2024 रोजी पीडितेचा विवाह झाला होता.
Ans: शेअर मार्केटमधील तोट्याचं कारण देत सासरकडून हुंड्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली.