
पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची 'विकास वारी'; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार
भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित राजेंद्र गावडे, राजू उर्फ शरद दत्ताराम मिसाळ, शैलजा अविनाश मोरे आणि शर्मिला राजू बाबर यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ काचघर चौक येथील मारुती मंदिरातून केला. देवासमोर नम्रता आणि जनतेसमोर आत्मविश्वास या दोन गोष्टींचा मेळ म्हणजे हा प्रचार! मंदिरात नारळ फोडला गेला, पण त्याआधी अनेक प्रश्नांची गाठ आधीच सुटलेली असल्याची भावना नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
प्राधिकरण सेक्टर २४ मधील भेटीगाठी म्हणजे केवळ औपचारिक फेऱ्या नव्हत्या, तर त्या कामाचा थेट हिशोब होत्या. काचघर चौक मारुती मंदिर, वाळके डॉक्टर, योगेश जैन, केदारेश्वर मंदिर, उज्ज्वल मेडिकल, ट्युलीप हॉटेल , हॉटेल मल्हार, आशिष पार्क, कबीर उद्यान, डॉ. गांधी हॉस्पिटल, निलकंटेश्वर मंदिर या प्रत्येक ठिकाणी प्रश्न कमी आणि संवाद जास्त दिसत होता. कारण जिथे काम झालेलं असतं, तिथे तक्रारी लाजतच बोलतात.
कार्यकर्त्यांचा जोश पाहता हा प्रचार नवखा वाटत नव्हता. तो अनुभवातून आलेला आत्मविश्वास होता. “जनसेवा, सुशासन आणि शाश्वत विकास” ही वाक्यं इथे फक्त बॅनरवर नव्हती, तर नागरिकांच्या बोलण्यात होती. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, विश्वास हा शब्द इथे उधार नव्हता; तो आधीच जमा होता.
या प्रचारात सलीम भाई शिकलगार, रमेश हवेली, मिलिंद कुलकर्णी, आनंदपुरे काका, प्रकाश टाकळकर, उमेश कुलकर्णी, शंकरराव किल्लेदार, महेश धाडवे, तात्यासाहेब गायकवाड, चंद्रशेखर जोशी, देविदास सांगडे, चेतन राऊत, अविनाश पाखरे, दीपक गावंदरे, हेमंत मयेकर, उदय रेडकर, अभिजीत पवार, पाटील काका, योगेश मदने, वैभवीताई घोडके, गणेश पाटील, साईनाथ समुद्र, अभिलाष कोठावळे, रितेश बंडगर, मोनिका कुलकर्णी, पुनम सपकाळ, सुनिता बाबर, रुकसाना नदाफ, प्रमिला चव्हाण, संध्या पवार, शुभांगी कुलकर्णी, प्रज्ञा दुर्वे, मीनल शिंदे, विलास मोरे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ही यादी पाहता स्पष्ट होतं की, हा प्रचार एका उमेदवाराचा नाही, तर संपूर्ण संघाचा आहे.