Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Police: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; चार सराईत गुन्हेगारांना केले तडीपार

भरधाव  ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पाठिमागे बसलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. तर, दुचाकी चालक तरुण जखमी झाला. कात्रज भागात हा अपघात घडला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2024 | 05:35 PM
Pune Police: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; चार सराईत गुन्हेगारांना केले तडीपार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरातील चार सराइत गुन्हेगारांना एकाचवेळी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी हे आदेश दिले आहेत. वनराज महेंद्र जाधव (वय २१), यशराज आनंद इंगळे (वय २३ ), हिमालय ऊर्फ गोलु मिटु बिश्त (वय २१, तिघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि मयुर विष्णु गुंजाळ (वय २६, रा शनीआळी, येरवडा) अशी तडीपार केलेल्या सराइतांची नावे आहे.

वनराज जाधव टोळीप्रमुख आहे. जाधव, इंगळे, बिश्त, गुंजाळ यांच्यावर खून, दहशत माजविणे, तोडफोड, अवैधरित्या शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जाधवसह साथीदारांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी तयार केला. तो प्रस्ताव पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांना सादर केला होता. या प्रस्तावाला उपायुक्त जाधव यांनी मंजुरी दिली. त्यानंतर जाधव याच्यासह चौघांना शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा:  दारूसाठी काय पण! चोरट्यांनी थेट बंद असलेले बार अँड रेस्टॉरंट….; पोलिसांकडून गुन्हा दाखल

भरधाव  ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पाठिमागे बसलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. तर, दुचाकी चालक तरुण जखमी झाला. कात्रज भागात हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनी कृष्णा श्रीवास्तव (वय २४, रा. वडाळा, मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार करण प्रवीण चिकणे (वय २४, रा. दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) हा जखमी झाला आहे. चिकणे याने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी ट्रकचालक सागर विलास थोरा (वय २९, रा. काशीद बिल्डींग, मांगडेवाडी, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार करण आणि त्याची मैत्रीण सोनी कात्रज भागातून निघाले होते. त्यावेळी गुजरवाडी फाटा परिसरात पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात पाठिमागे बसलेली सोनी या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तपास करत आहेत.

हेही वाचा: Pune Accident News: कात्रजमध्ये ट्रकची दुचकीला धडक; दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू

कात्रजमधील ‘त्या’ हुक्का पार्लरबाबतचे स्मरणपत्र व्हायरल

पुणे शहरातील अवैध धंद्याबाबत तंबी देऊन अन् ६५ जणांची उचलबांगडी केल्यानंतर देखील त्यांची जागा आता नव्या वसूलीदारांनी घेतली आहे. परिणामी अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असून, कात्रजमधील एका हुक्का पार्लरबाबतचा स्मरणपत्राचा एक मॅसेज सध्या पोलीस दलात प्रचंड व्हायरल होत आहे. स्मरणपत्राच्या मॅसेजमध्ये ६ वेळा हुक्का पार्लरबाबत तक्रार करूनही तो सुरूच आहे, असा आरोप केला जात आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्याभरापुर्वीच येथे कारवाई केली होती. तरीही तो हुक्का पार्लर सुरू असल्याचे सांगितले जाते. तत्पुर्वी नुकताच कात्रजमधील तीन पत्ती जुगारावर छापा मारून भारती विद्यापीठ पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे शहरातील अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरूच असल्याचे दिसते.

 

Web Title: Pune police take big decision for 4 criminals precautions for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 05:35 PM

Topics:  

  • Pune
  • Pune crime news in marathi

संबंधित बातम्या

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न
1

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत
2

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय
3

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
4

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.