Pune Police's Operation 'Muskaan Mission' to search for missing children and women from Pune
पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच महिला व लहान मुलांना अपहरण करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे पुणे पोलिसांनी नवीन प्लॅन केला आहे. पुण्यातून बेपत्ता झालेल्या मुलांच्या तसेच महिलांच्या शोधासाठी पुणे पोलीस ‘ऑपरेशन मुस्कान – १३’ ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत ही मोहिम राबविली जाणार असून, मोहिमेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्यांत पथकाची स्थापना करण्यात येणार आहे.
‘ऑपरेशन मुस्कान – 13 ’ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि 18 वर्षांवरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणार आहे. एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलीस विभागाकडून ही विशेष मोहिम राबवली जाते. शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातून बेपत्ता झालेली लहान मुले, महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतात. मात्र, दरवर्षी एक महिना यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यानुसार यंदाही ही मोहिम राबविली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पथकाच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश राहणार आहे. मोहिमेतंर्गत पुणे शहर तसेच परिसरातून बेपत्ता झालेली मुले आणि महिला व तरुणींचा शोध घेण्यात येणार आहे.
क्राईम न्यूज अपडेट वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ड्रग्जसाठ्यावर पुणे पोलिसांचा छापा
पुण्याच्या मध्यभागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराकडून ‘ड्रग्ज’साठा पकडला आहे. १४ लाख ६० हजार रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला असून, त्यासोबतच एक पिस्तूल आणि दोन काडतूसे जप्त केली आहेत. धक्कादायक म्हणजे, सराईताने “गेम” करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती समोर आली आहे. शहरात दोन मोठी ड्रग्जप्रकरण समोर आल्यानंतर पुणे पोलिसांकडून ड्रग्जडिलर, पेडलर यांच्यावर नजर ठेवली जात आहे. त्यानंतरही शहरात छुप्या पद्धतीने ड्रग्जची विक्री होत आहे. तर, आता थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर देखील पोलीस सतर्क झाले आहेत. यादरम्यान, गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक दोन व खंडणी विरोधी पथक दोनचे अधिकारी व पथक गस्त घालत होते. तेव्हा पथकाला माहिती मिळाली की, बॉबी सुरवसे आणि तोसिम खान यांच्याबाबत माहिती मिळाली. ते शुक्रवार पेठेतील मारूती मंदिराजवळ डायमंड बिल्डींगच्या शेजारी थांबले असून, त्यांच्याकडे अमली पदार्थ व पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने छापा टाकून या दोघांना पकडले. तेव्हा बॉबी सुरवसे याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन काडतूस तसेच बॉबी व तोसिम याच्याकडून १४ लाख ६० हजार रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ देखील मिळाला आहे.