चुलत भावावरच हल्ला करण्याचा प्रयत्न (फोटो- istockphoto)
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 8 नोव्हेंबर रोजी आरोपीने दुकानातील वारसा हक्काने येणारा हिस्सा मागण्यासाठी घरामध्ये घुसले. यावेळी दिपक माने यांना शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच दुकानामध्ये पेट्रोलची बॉटल टाकून हातातील कोयत्याने शेखर माने यांना व चुलते संजय माने यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.
नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक
रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. राजेश दिनकर राजगुरु (वय ५०, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पाथर्डी शिवार, नाशिक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत ३५ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा: Fraud News: रेल्वेत नोकरी लावतो सांगितले अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार चिंचवड परिसरात राहायला आहेत. त्यांची आरोपी राजगुरु याच्याशी २०२१ मध्ये ओळख झाली होती. तक्रारदाराच्या परिचितांना राजेश याने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. रेल्वेतील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केली. नंतर तक्रारदाराने राजेशला वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात दहा लाख रुपये दिले.
पुण्यात 14 लाखांचे ड्रग्स जप्त
पुण्याच्या मध्यभागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराकडून ‘ड्रग्ज’साठा पकडला आहे. १४ लाख ६० हजार रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला असून, त्यासोबतच एक पिस्तूल आणि दोन काडतूसे जप्त केली आहेत. धक्कादायक म्हणजे, सराईताने “गेम” करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: Drugs Seized: पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! १४ लाखांचे मेफेड्रोन जप्त; पिस्तूल आणि काडतूसेही जप्त
बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर येरवडा) आणि तोसिम ऊफ लडडु रहिम खान (वय ३२, रा. १२८२ दर्गारोड, कसबा पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस फौजदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे व त्यांच्या पथकाने केली आहे.