Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॉईस नंबरमधून पुणे आरटीओ मालामाल; यंदा तब्बल १५ कोटी…

वाहनांचा चॉईस नंबर मिळावा यासाठी अनेक व्हिआयपींकडून मागणी होत असते. अशाच चॉईस नंबरमधून पुणे आरटीओ मालामाल झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 04, 2025 | 11:08 AM
चॉईस नंबरमधून पुणे आरटीओ मालामाल; यंदा तब्बल १५ कोटी…
Follow Us
Follow Us:

पुणे : वाहनांचा चॉईस नंबर मिळावा यासाठी अनेक व्हिआयपींकडून मागणी होत असते. अशाच चॉईस नंबरमधून पुणे आरटीओ मालामाल झाले असून, गेल्या वर्षात तब्बल ६० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ कोटींची वाढ या चॉईस नंबरमुळे झाली आहे.

नवीन खरेदी केलेल्या वाहनाला आकर्षक तसेच लक्की नंबर मिळावा यासाठी अनेकजन प्रयत्न करतात. काही हौशी वाहन मालक चॉईस नंबरसाठी वाट्टेल तितका पैसाही मोजतात. परिवहन विभाग अशा नंबरसाठी पैशांची आकारणी करतो. काही ठरावीक रक्कम त्यासाठी आकरलेली असते. त्या रकमेचा धनादेश भरून तो आरटीओ कार्यालयात जमा करावा लागतो. नंतर तो नंबर संबंधीत वाहनधारकासाठी राखीव करून ठेवण्यात येतो. मात्र, एका नंबरसाठी दोन वाहनधारकांचे धनादेश आल्यास त्यातील सर्वाधिक रकमेच्या धनादेश धारकाला तो नंबर दिला जातो. यासाठी आरटीओ कार्यालयात लिलाव पद्धत देखील राबवत असते.

आरटीओच्या चॉईस नंबर प्रक्रियेतून परिवहन विभागाला प्रचंड प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २०२३ -२४ या वर्षभरात आरटीओ कार्यालयाला एकूण ४४ कोटी ७७ लाख १० हजार रुपये महसूल मिळाला. यासाठी ५२ हजार ४७३ जणांनी अर्ज केले होते. तर, २०२४ – २५ म्हणजे यंदा यात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महसूल १५ कोटींनी वाढला असून ५० कोटी ३६ लाख ९२ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची नोंद आरटीओत आहे.

ऑनलाईन प्रक्रिया अन् शुल्क वाढ

चॉईस नंबर मिळविण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन करण्यात आली आहे. वाहनधारकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने चॉईस नंबर मिळविता येतो. त्यात काही महिन्यांपुर्वी चॉईस नंबरसाठीचे शुल्क वाढविले होते. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा महसूल वाढला आहे. सद्यस्थितीत आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून ओटीपीच्या सहाय्याने वाहनधारकांना ऑनलाईन पेमेंट करून नंबर घेता येत आहे. यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही.

Web Title: Pune rto has received a lot of revenue due to choice number nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
1

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी
2

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
3

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
4

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.