
कॉलेज सुटलं अन् तरुणी लिफ्टमध्ये अडकली! 14 तास अन्न-पाण्याविना काढली रात्र
वाघोलीतील १९ वर्षीय तरुणी राहायला आहे. ती लोणी काळभोरमधील नामवंत शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ती घरी निघाली होती. इमारतीतील लिफ्टमधून ती तळमजल्यावर येत होती. त्यावेळी वीज पुरवठा खंडीत झाला आणि लिफ्ट पाचव्या व सहाव्या मजल्याच्या मधोमध अडकली. तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी, तसेच कर्मचारी बाहेर पडल्याने तिचा आवाज ऐकू आला नाही. रात्रभर ती अंधारात होती. अन्न पाण्याविना तिने लिफ्टमध्ये रात्र काढली.
दरम्यान, मुलगी घरी न आल्याने पालक चिंतेत होते. त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला. तळमजल्यावर थांबलेल्या एका महिलेने लिफ्टचे बटण दाबले. लिफ्ट सुरू झाल्यानंतर तळमजल्यावर आली. तरुणी भेदरलेल्या अवस्थेत लिफ्टमध्ये होती. तिला धीर देण्यात आला. तेव्हा तिने १४ तास लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती दिली. लिफ्टमधून ती सुखरुप बाहेर पडल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. आमची कोणीबाबत तक्रार नाही, असे पालकांनी सांगितले. मात्र, याप्रकाराची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. तांत्रिक जबाबदारी कोणाची आहे, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे, असे लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक समाधान पवार यांनी सांगितले.
Ans: लोणी काळभोर येथील शैक्षणिक संस्थेच्या इमारतीतील लिफ्टमध्ये १९ वर्षीय तरुणी तब्बल १४ तास अडकली होती.
Ans: बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ती लिफ्टने तळमजल्यावर येत असताना वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे लिफ्ट पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या मधोमध अडकली.
Ans: दुसऱ्या दिवशी पहाटे सहाच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर लिफ्ट सुरू झाली आणि तरुणीची सुखरूप सुटका झाली. या प्रकरणाची लोणी काळभोर पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.