Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

रात्रीच्या वेळी विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर तरुणाला अडवून शिवीगाळ करत मारहाण केल्यानंतर त्याच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने चोरून नेल्याच्या प्रकरणात येरवडा पोलिसांनी एका १९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2026 | 12:52 PM
पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:
  • रात्रीच्या अंधारात तरुणाला अडवून मारहाण
  • पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार
  • ५८ हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला अटक
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रात्रीच्या वेळी विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर तरुणाला अडवून शिवीगाळ करत मारहाण केल्यानंतर त्याच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने चोरून नेल्याच्या प्रकरणात येरवडा पोलिसांनी एका १९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. रेहान अश्रफ शेख (वय १९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेला २० हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ९ नोव्हेंबर रोजी रात्री पुणे-नगर रस्त्यावरील विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना कोणतेही कारण नसताना अडवले. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील सॅमसंग कंपनीचा मोबाईल, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि २९ हजार ६०० रुपये रोख असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. या घटनेनंतर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

४० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

गुन्ह्याचा तपास करताना पोलिस अंमलदार गणेश पालवे, नटराज सुतार आणि संदीप जायभाये यांनी घटनास्थळासह परिसरातील सुमारे ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. यावेळी संशयित आरोपी लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून रेहान शेख याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करून त्याच्याकडून फिर्यादीचा चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : ड्युटी संपवून घरी जाताना काळाचा घाला; कंपनीच्या बसखाली सुपरवायझरचा मृत्यू

अन्य दोन आरोपींचा शोध सुरू

या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध येरवडा पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक किशोर बेरड करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: जबरी चोरी प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: रेहान अश्रफ शेख (वय १९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

  • Que: तरुणाकडून किती रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता?

    Ans: तरुणाकडील मोबाईल, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि २९ हजार ६०० रुपये रोख असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता.

  • Que: पोलिसांनी आरोपीकडून काय हस्तगत केले?

    Ans: येरवडा पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला २० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: The police have arrested one person for assaulting a young man at night nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या ‘स्मार्ट’ करण्याचा निर्णय
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या ‘स्मार्ट’ करण्याचा निर्णय

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई
2

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई

Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ…
3

Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ…

कॉलेज सुटलं अन् तरुणी लिफ्टमध्ये अडकली! 14 तास अन्न-पाण्याविना काढली रात्र
4

कॉलेज सुटलं अन् तरुणी लिफ्टमध्ये अडकली! 14 तास अन्न-पाण्याविना काढली रात्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.